Election : ‘शिर्डी’साठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Election : 'शिर्डी'साठी निवडणूक यंत्रणा सज्ज

0
Election Commisssion

Election : श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झालेली आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांना येत्या १५ एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करण्याची संधी असून अंतिम मतदार यादी (Voter List) जाहीर होण्यापूर्वी मतदारांनी मतदार यादी बघून आपले नाव असल्याचीही खात्री करावी, असे आवाहन सहायक निवडणूक (Election) निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत यांनी केले आहे.

हे देखील वाचा : कर्जत एमआयडीसीचा प्रश्न पुन्हा न्यायालयात

लोकसभा निवडणुकीबाबत सविस्तर माहिती


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून निवडणुकीबाबत सविस्तर माहिती दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, संदीप पाळंदे, गणेश पिंगळे आदी उपस्थित होते. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ३११ मतदान केंद्र आहेत. पुरुष मतदार १ लाख ५२ हजार ३६३, स्त्री मतदार १ लाख ४७ हजार ८४६, इतर ६० एकूण ३ लाख २६९ मतदार असून ८५ वर्षे वयापुढील मतदार १२६ आहेत तर दिव्यांग मतदार ६० आहेत. २६ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

Election

नक्की वाचा : सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांवर होणार कारवाई

आदर्श आचारसंहिता राबविण्यासाठी यंत्रणा सज्ज (Election)

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी साठी सहा टीम तयार करण्यात आल्या असुन बारा बारा तास त्या काम करतील. ६९ मार्गावरून सर्व साहित्य व मतदान कर्मचारी वाहतुकीसाठी ३३ बसेस व खाजगी बसेस ८, जीप २८ एकूण ६९ वाहने तैनात करण्यात आले आहेत. तर इतर यंत्रणेसाठी व ८५ वर्षापुढील मतदारांच्या घरी जाऊन मतदान करून घेण्यासाठी १२ जीप तर दिव्यांगासाठी १२ जीप तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष ३४२, मतदान अधिकारी ६८४, महिला मतदान अधिकारी ३४२, ३४२ शिपाई व इतर असे १ हजार ७१० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here