Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत लोकप्रतिनिधीचा निर्णय अंतिम : अनिल मोहिते

Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत लोकप्रतिनिधीचा निर्णय अंतिम : अनिल मोहिते

0
Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत लोकप्रतिनिधीचा निर्णय अंतिम : अनिल मोहिते
Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत लोकप्रतिनिधीचा निर्णय अंतिम : अनिल मोहिते

Election : नगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Elections) दोन तृतियांश भाजप (BJP) शत प्रतिषद जागा निवडून आणणार आहे, असे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते (Anil Mohite) यांनी सांगितले. तसेच स्थानिक पदाधिकारी  निवडणूक लढविण्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) तसेच जिल्ह्यातील सर्व भाजपचे आमदार, पदाधिकारी जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल

जिल्हा भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन

विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन, गरिबी कल्याणाची अकरा वर्ष पूर्ण झाले आहेत. या ११ वर्षात केंद्र शासनाने घेतलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी जिल्हा भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित (Election)

यावेळी भाजपचे उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, दक्षिणचे दिलीप भालसिंग, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या ११ वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत. अहिल्यानगर येथील एमआयडीसीची पूर्वी दुरवस्था झाली होती. आता या ११ वर्षात शिर्डी, नगर, सुपा, हरेगाव या ठिकाणी नवनवीन कंपन्या येत आहेत. त्यामुळे नागरिकांना रोजगार मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे सुरू असल्याचेही दिनकर यांनी सांगितले. तसेच सुपा एमआयडीसी बाबत जी दहशत होती, ती संपलेली आहे. यापुढे उद्योजकांना कुठलाही त्रास होणार नाही. यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी वारंवार बैठका घेत अधिकाऱ्यांना सूचना दिले आहेत. त्यामुळे उद्योजकांना घाबरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. 

नगर एमआयडीसीच्या विस्तारणीकरणाबाबत काही तांत्रिक अडचणी होत्या. आता त्या दूर झाले आहेत. त्यामुळे आता नगरच्या एमआयडीसीचा विकास होणार असल्याचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी सांगितले. आगामी काळात या एमआयडीसी मध्ये शस्त्रास्त्रे, वेपन निर्मितीचे नवीन प्रकल्प येऊ शकतात. हे नवीन प्रकल्प आल्यास छोट्या मोठ्या व्यवसायिकांना संधी मिळणार आहे. तसेच नगर ते पुणे दुमजली महामार्गासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच जमीन हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आगामी काळात या मार्गावर मेट्रो चालू करण्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे स्वप्न आहे. ते लवकरच पूर्ण होईल. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात वर रूम केली आहे. त्यामुळे लवकरच या कामाला गती येणार आहे, असे सांगितले.