Election : अकोले : येथील हिंद सेवा मंडळ (Hind Seva Mandal) संचलित मॉडर्न हायस्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जीएस पदासाठी चार आणि एलआर पदाकरिता चार उमेदवार उभे होते. विद्यार्थ्यांनी बालवयातच प्रत्यक्ष लोकशाहीचे (Democracy) धडे गिरवत संपूर्ण निवडणूक (Election) यंत्रणेचे नियोजन केले.
नक्की वाचा : श्रीगोंद्याच्या सिमेंट प्रकल्पास खा. लंके यांचा विरोध
प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी
उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, चिन्ह वाटप करणे, मतपत्रिका छापणे, अंतिम उमेदवारी यादी, प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान व मतमोजणी या सर्व लोकशाही प्रक्रियेत ज्या ज्या गोष्टी असतात त्याच या निवडणुकीच्या निमित्ताने विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना अनुभवयास मिळाले. या निवडणुकीत प्रथमेश जयराम मंडलिक हा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विजयी झाला तर साक्षी दादासाहेब बहिरट ही विद्यार्थिनी प्रतिनिधी पदासाठी निवडून आली.
अवश्य वाचा : दगडफेक,जाळपोळ; यवतमध्ये फेसबुक पोस्टमुळे राडा
शिक्षकांच्या सहकार्याने पार पडले मतमोजणीचे काम (Election)
मतमोजणी प्रसंगी मुख्याध्यापिका कांबळे, उपमुख्याध्यापक सुधीर जोशी, पर्यवेक्षक धर्माधिकारी, माजी मुख्याध्यापक संतोष कचरे, डॉ. संदीप कडलग, दिलीप शहा, सहाय्यक सचिव योगेश देशमुख, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष मोरेश्वर धर्माधिकारी, ज्युनिअर कॉलेज विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब वडजे आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. गणेश जोशी, गायकर, खराटे, घुले, रामदास वैद्य, दिलीप झोळेकर, प्रमोद जोशी यांनी निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. सर्व शिक्षकांच्या सहकार्याने मतमोजणीचे काम पार पाडले गेले. विजयी झालेल्या पदाधिकार्यांनी मनोगते व्यक्त केली.