Election: युवकाला मारहाण; माजी नगरसेवकांसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

Election: युवकाला मारहाण; माजी नगरसेवकांसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

0
Election: युवकाला मारहाण; माजी नगरसेवकांसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल
Election: युवकाला मारहाण; माजी नगरसेवकांसह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

Election: नगर : निवडणुकीत(Election) विरोधात प्रचार करत असल्याचा राग मनात धरून एका युवकाला गावठी कट्ट्याचा(Country-made pistol) धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी(Death threat) देत मारहाण केल्याची घटना मुकुंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी रविवारी (ता. ४) रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात(Bhingar Camp Police Station) माजी नगरसेवकासह सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : निवडणुकीत ‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास काय होणार ?

गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे

यासीर अन्सार सय्यद (वय २१, रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) याने फिर्याद दिली आहे. समीर जाफर खान, समद वाहब खान, खालीद दिलदार शेख, सोफियान समद खान, माजिद समद खान, मुजीब अल उर्फ भुऱ्या अजिज खान आणि नावेद रशिद शेख (सर्व रा. मुकुंदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

अवश्य वाचा: अहिल्यानगर महापालिकेत युतीचाच महापौर : रवींद्र चव्हाण; युतीच्या प्रचाराला प्रारंभ

आमच्या विरूध्द प्रचार करतोस असा बनाव रचून मारहाण (Election)

फिर्यादी हे मुकुंदनगर भागातील अमिना मैदान परिसरातून जात असताना संशयित आरोपींनी त्याला अडवले. तू आमच्या विरूध्द प्रचार करतोस, असा बनाव रचून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला घेराव घातला. यावेळी आरोपींनी फिर्यादीला कट्ट्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.