Election : पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू

Election : पाणीपुरवठा सुरळीत करा; अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकू

0
Election
Election

Election : पाथर्डी : येत्या दोन तारखेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, पालिका हद्दीतील नागरिकांसाठी पंधरा टँकर मिळावे, असा प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावा तसेच वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी विशेष पथक तैनात करावे, अन्यथा गाव बंद ठेऊन लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीवर (Election) बहिष्कार (Boycott) टाकू असा इशारा एका निवेदनाद्वारे आज सर्वपक्षीय नेत्यांनी पालिका प्रशासनाला दिला.

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

अनियमित व दूषित पाणीपुरवठा (Election)

शहराचा पाणीपुरवठा सध्या चांगलाच विस्कळीत झाला असून नागरिकांची पाण्यासाठी मोठी फरफट होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांच्या नेतृत्वाखाली भगवान बांगर, बंडू पाटील बोरुडे, नासिर शेख, सीताराम बोरुडे, भगवान दराडे, अशोक मंत्री, रमेश गोरे, रामनाथ बंग, चांद मणियार, सुभाष केकाण, राजेंद्र शेवाळे, अजय भंडारी, नागनाथ गर्जे, किशोर डांगे या सर्वपक्षीय नेत्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांना एक निवेदन दिले असून त्यामध्ये म्हंटले आहे की गेल्या दोन महिन्यांपासून शहराला सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. जो पाणीपुरवठा केला जातो तो दूषित आहे.

नक्की वाचा: ‘देवेंद्र फडणवीस ज्याला आशीर्वाद म्हणतात तो सत्तेचा गैरवापर’-रोहित पवार

गाव बंद ठेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा (Election)

दैनंदिन ३५ लाख लिटर पाण्याची शहराला आवश्यकता असताना प्रत्यक्षत केवळ दहा ते पंधरा लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. जलशुद्धीकरण यंत्रणा अद्यावत करावी. या संदर्भात आचारसंहितेचे कारण सांगून नागरिकांना वेठीस धरले जात असून तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करून आठवड्यातून दोन वेळेस पाणीपुरवठा करावा अन्यथा गाव बंद ठेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here