Election : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

Election : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

0
Election : मॉडर्नच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली निवडणूक प्रक्रिया

Election : अकोले: नुकतीच लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Elections) झाली, विधानसभेची (Assembly) लवकरच होणार आहे. लहान मुलांना मतदान नेमके कसे असते? याची उत्सुकता असते. लोकशाहीत (Democracy) सरकार बदलण्याच्या निवडणूक प्रक्रियेचा अनुभव लहान वयात विद्यार्थ्यांना येण्यासाठी मॉडर्न हायस्कूल अकोले या विद्यालयाने शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक सार्वत्रिक निवडणूक (Election) घ्यावी, अशा प्रकारे घेतली.

नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

विद्यार्थ्यांना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अनुभव (Election)

उमेदवारी अर्ज भरणे, छाननी, निवडणूक चिन्ह, मतपत्रिका छपाई करून शाळेत प्रचार सभा घेतली. त्यानंतर निवडणूक अधिकारी नियुक्त करून बूथ उभारले. त्या बुथवर बंदोबस्तासाठी एनसीसी कॅडेट नेमले. मतपेटी, मतदान कक्ष, बोटाला शाई अशा वातावरणात रांगा लावून विद्यार्थ्यांनी शिक्का मारून मतदान केले. त्यात पुन्हा नोटाचा पर्याय होता. या मतदानानंतर दुसर्‍या दिवशी सर्वांसमोर मतमोजणी झाली. मतमोजणी जशी होते, तशीच टेबल मांडून फेर्‍या करत झाली. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा अनुभव यानिमित्ताने विद्यार्थ्यांना घेता आला.

अवश्य वाचा : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

देशातील सरकारे कशी निवडली जातात याचे प्रात्यक्षिक (Election)

देशातील सरकारे कशी निवडली जातात हे अनुभवता आले. गणेश जोशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर शिक्षक गायकर, खराटे, घुले यांनी सहायक म्हणून काम केले. या निवडणुकीला भेट द्यावी म्हणून तालुक्यातील प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांना पत्र पाठवण्यात आले. अनेक कार्यकर्ते, पत्रकार, स्कूल कमिटी सदस्य व पालकांनी निवडणुकीला भेट दिली. उच्च माध्यमिक व माध्यमिक विभागाचे अध्यक्ष दिलीप शहा व सतीश बूब यांनी अंतिम निकाल घोषित केला. त्यात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सुयोग गोडे तर कांचन चौधरी ही विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवडून आली. मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी, उपमुख्याध्यापक चित्रा कांबळे, पर्यवेक्षक सुधीर जोशी यांनी त्यांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here