Election : ‘मॉडर्न’मध्ये लोकशाही पद्धतीने विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक

Election : 'मॉडर्न'मध्ये लोकशाही पद्धतीने विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडणूक

0
Election

Election : अकोले : येथील मॉडर्न ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी (Student Representative) व विद्यार्थिनी प्रतिनिधी निवडीसाठी विद्यार्थी मंडळातर्फे लोकशाही पद्धतीने निवडणूक (Election) घेण्यात आली. लोकशाही (Democracy) प्रणालीप्रमाणे अर्ज भरून घेणे, अर्जाची छाननी करणे, उमेदवारी मागे घेणे व उमेदवार (Candidate) जाहीर करणे, चिन्हांचे वाटप करणे इत्यादी लोकशाहीतील विविध कार्यपद्धतीचा अवलंब करून निवडणूक प्रक्रिया तसेच प्रचार या सर्व प्रक्रिया घेण्यात आल्या.

नक्की वाचा: मनिष सिसोदिया यांना’सर्वोच्च’न्यायालयाचा दिलासा;दिल्ली मद्यधोरण प्रकरणात जामीन मंजूर

प्रचलित पद्धतीप्रमाणे मतदान

गुरुवारी (ता.8) मतदान घेण्यात आले. प्रचलित पद्धतीप्रमाणे बूथची रचना तयार करण्यात आली. त्यामध्ये केंद्रप्रमुख व इतर मतदान अधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. दोन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले. अशा दोन मतदान केंद्रावर एकूण 533 विद्यार्थी मतदारांनी मतदान केले. यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधीसाठी निवेश किशोर अडांगळे, साहिल सचिन शिंदे, सिद्धेश राजेंद्र नवले व यशराज किरण देशमुख असे चार उमेदवार तर विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी जान्हवी संदीप वाकचौरे, पायल किशोर बाळसराफ, शुभांगी त्रिंबक लांघी व तृप्ती ज्ञानेश्‍वर माने अशा चार विद्यार्थिनी उमेदवारी करत होत्या. त्यात पायल अशोक बाळसराफ ही 242 मते घेऊन विजयी झाली. तर यशराज किरण देशमुख हा 256 मते घेऊन विजयी झाला.

अवश्य वाचा : कांद्याच्या हमीभावाची मागणी; इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक

विजयी उमेदवारांना गोपनीयतेची शपथ (Election)

विजयी उमेदवारांना गोपनीयतेची शपथ प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांनी दिली. तर सर्व उमेदवारांसह विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष व मॉडर्न ज्युनिअर कॉलेज विभागाचे अध्यक्ष दिलीप शहा, मॉडर्न हायस्कूलचे अध्यक्ष सतीश बुब उपस्थित होते. या सर्व निवडणूक प्रक्रियेत उपप्राचार्य दीपक जोंधळे, निवडणूक निर्णय अधिकारी बबन कासार, ऋषीकेश नगरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी योगदान दिले.

Election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here