Election : मतदानाचा दिवशी ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे निवडणूक आयुक्तांचे आदेश

Election : मतदानाचा दिवशी ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे निवडणूक आयुक्तांचे आदेश

0
Election : मतदानाचा दिवशी ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे निवडणूक आयुक्तांचे आदेश

Election : नगर : महाराष्ट्रातील (Maharashtra) आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) गेल्या २ दिवसांत राज्यातील राजकीय पक्ष व विविध संस्थांशी चर्चा करुन निवडणुकांसाठीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसंदर्भात (Assembly Elections) आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाची माहिती दिली.

Election

नक्की वाचा: भाऊबीजेच्या ओवाळणीपासून एकही बहीण वंचित राहणार नाही; देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नांना दिली उत्तरे

राज्यातील मतदारांची संख्या, पुरुष, महिला, तृतीयपंथी मतदार आणि मतदारांमध्ये झालेल्या वाढीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी माहिती दिली. निवडणूक मतदानाचा दिवस हा पगारी सुट्टी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Election

अवश्य वाचा: नगर शहरासाठी लवकरच ४० इलेक्ट्रिक बसेस – नीलेश लंके

मतदानाचा दिवस हा पगारी सुट्टीचा दिवस असणार (Election)

निवडणुकीतलं मुख्य टप्पा असलेल्या मतदानाच्या दिवशी अनेक कामगार मतदानापासून वंचित राहतात. कारण आपल्या कामाचे खाडे लागले जाईल, आपला दिवसाचा रोजगार कपात होईल म्हणून गरिब वस्तीत किंवा रोजंदारी व इंडस्ट्रीजमध्ये कामाला जाणारे कामगार मतदानाला येत नाहीत. कामगार वर्गाने मतदानाला यावे, मतदानाला भरभरुन प्रतिसाद द्यावा, त्यासाठी मतदानाच्या दिवसी भरपगारी सुट्टी देण्यात येत असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासंदर्भात प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली असून निवडणूक मतदानाचा दिवस हा पगारी सुट्टीचा दिवस असेल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

यामुळे एमआयडीसी काम करणारे कामगार किंवा असंघटीत कामगाार क्षेत्रातील मतदारांनी पगार कापला जाईल, अशी भीती न बाळगता मतदानासाठी बाहेर यावे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच, ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्या संस्थावर कारवाईचे थेट आदेश राहतील,असेही आयोगाने सांगितले.