Election : अहिल्यानगर : जिल्हाधिकारी (Collector) तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी (Assembly Constituency) मध्यवर्ती प्रशासकीय इमारत श्रीरामपूर येथे निवडणूक (Election) कामकाज आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी केली.
अंगणवाडी सेविकेचा खून करणारा आरोपी २४ तासांत गजाआड
मतदारसंघाचे अधिकारी उपस्थित
याप्रसंगी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किरण अरुण सावंत पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुमार वाघ, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, (Election)
निवडणूक आयोगामार्फत देण्यात आलेल्या सुचनांचे पालन करण्यात यावे. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासोबत निवडणुकीसाठी आवश्यक व्यवस्थेची वेळेत तयारी करावी, असे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या सर्व विभागांचा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था, ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्राँगरूममधील जागेचे नियोजन याबाबतची सविस्तर माहिती घेतली.