Election : जिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन

Election

0
Election : जिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन
Election : जिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन

Election : श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) चुरशीची लढत होणार आहे तरी निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, याबाबत सूचना देत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथे निवडणूक संदर्भात प्रशिक्षण वर्गास जिल्हाधिकारी (Collector) अहिल्यानगर सिद्धराम सालीमठ यांनी भेट देऊन निवडणूक (Election) प्रक्रिया बाबत निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नक्की वाचा: श्रीरामपुरातील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटेना

१७६५ प्रशिक्षणार्थी उपस्थित

श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव महाविद्यालयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला प्रशिक्षण वर्ग रविवारी (ता.२७) निवडणूक अधिकारी तसेच मतदान अधिकारी यांचे दोन सत्रात प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणासाठी केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी कर्मचारी अशी एकूण १७६५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तर दोन्ही सत्रात मिळून १७९ कर्मचारी अनुपस्थित होते. यावेळी केंद्राध्यक्ष यांची कामे व जबाबदारी तसेच इतर मतदान अधिकारी यांची कामे व जबाबदारीचे स्वरूप विस्तृत स्वरूपात सांगितले.

Election : जिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन
Election : जिल्हाधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन

अवश्य वाचा: माझ्यावर हल्‍ला करण्‍याचा कट : सुजय विखे पाटील

मतदान प्रक्रिया कशी करावी, याचे मार्गदर्शन (Election)

मतदानाच्या दिवशी, अगोदरच्या दिवसाची कामे व मतदान दिवस याची कामे आणि मतदान संपल्यानंतरची सर्व प्रक्रिया कशी करावी, याचे मार्गदर्शन निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत यांनी करत मतदान कक्ष उभारणी, सुरक्षा व्यवस्था याबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे, नायब तहसीलदार निवडणूक पंकज नेवसे, गटविकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, सर्व महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.