Election : अहिल्यानगर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Assembly Elections) भारत निवडणूक आयोगातर्फे (Election Commission of India) नियुक्त, निवडणूक निरीक्षक, निवडणूक (Election) पोलीस निरीक्षक आणि निवडणूक खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
नक्की वाचा: प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली,रुग्णालयात दाखल
विविध अधिकाऱ्यांची उपस्थिती
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस निवडणूक निरीक्षक (सामान्य) ताई के, अरुण कुमार, डी. रथ्ना, श्रीमती रंजीता, निवडणूक पोलीस निरीक्षक नागेन्द्र नाथ त्रिपाठी, खर्च निरीक्षक अरूण चौधरी, ग्यानचंद जैन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा: “६ नोव्हेंबरपासून राहुल गांधी, मी आणि उद्धव ठाकरे प्रचार सुरु करतोय” : शरद पवार
जिल्ह्याच्या तयारीबाबत व्यक्त केले समाधान (Election)
निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्याच्या तयारीबाबत समाधान व्यक्त करतांना निवडणूक तयारी, सुरक्षा व्यवस्था आदीबाबत सूचना केल्या. जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. जिल्ह्यात निवडणुकीची सर्व तयारी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात येत असून मनुष्यबळ, ईव्हीएम, मतदान केंद्र आदी संदर्भातील नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान कर्मचाऱ्यांचे पाहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून दुसरे १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ४६४ एसटी बस, १ हजार ११५ जीप, १२५ मिनी बस, १०७ क्रुझर, ४१ कार्गो वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे. सी व्हिजील आणि १९५० क्रमांकावर येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. २ हजार ३२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकऱ्यांनी दिली.
आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे भंग केल्याप्रकरणी ८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आतापर्यंत अवैध मद्य, रक्कम, ड्रग्स आदी मिळून ४ कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे, माहिती अपर पोलीस अधीक्षक यांनी दिली.
निवडणूक निरीक्षकांची माध्यम केंद्राला भेट
बैठकीनंतर निवडणूक निरीक्षकांनी माध्यम केंद्राला भेट देऊन माध्यम संनियंत्रणाबाबत माहिती घेतली. माध्यम केंद्रातर्फे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार समाजमाध्यमातील जाहिराती आणि आक्षेपार्ह मजकुरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून माध्यम संनियंत्रणाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने होत असल्याचे निरीक्षकांनी सांगितले.