Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; घरबसल्या करता येणार मतदान

Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; घरबसल्या करता येणार मतदान

0
Election Commission

Election Commission : नगर : महाराष्ट्रात (Maharashtra) आता पहिल्यांदाच घरात बसून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून (Election Commission) उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. ८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे देखील वाचा: रायगडावर घुमले ‘तुतारी’चे नाद; शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचं अनावरण

१२ डी क्रमांकाचा अर्ज सादर करावा लागणार

 
 पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे यांनी याबाबत माहिती दिली. देशपांडे म्हणाले, ”ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक घोषित झाल्यानंतर ५ दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे १२ डी क्रमांकाचा अर्ज सादर करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असून प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधितांच्या घरी केली जाणार आहे. निवडणूक जाहीर झाली की, १२ डी हा फाॅर्म घरपाेच मिळणार आहे. मतदानापूर्वी या व्यक्तींकडून त्यांचे मतदान करून घेण्यात येईल.

नक्की वाचा: शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; आणखी १ शेतकऱ्याचा मृत्यू

मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न (Election Commission)

मतदान माेठा उत्सव आहे. मतदान केंद्रावर येऊन मतदान करण्यासाठी आम्ही जागरूक करणार आहाेत. घरात बसून मतदान करण्याचा प्रयाेग कसबा पाेट निवडणुकीत करण्यात आला हाेता. घरी बसून व्हिडिओ रेकाॅर्ड मतदान करता येणार आहे. काेणी मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी आमचा प्रयत्न आहे. निवडणूक काळात लिकर, ड्रग्ज, पैसे यांच्यावर कंट्राेल करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. २२ डिपार्टमेंट आणि काही केंद्रीय यंत्रणा यावर काम करीत आहे. निवडणूक आयाेगाने दाेन नवीन ॲप तयार केले आहे. त्यामुळे एखादी तक्रार आल्यास शंभर मिनिटांच्या आत त्याचा निपटारा हाेणार आहे. नागरिकांचे मतदान वाढवण्यासाठी माेहीम राबवली जाणार आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here