Election Commission : उमेदवारांचा खर्च दणक्यात; सुजय विखे ५४ लाख, तर नीलेश लंके ३१ लाख खर्च

Election Commission : उमेदवारांचा खर्च दणक्यात; सुजय विखे ५४ लाख, तर नीलेश लंके ३१ लाख खर्च

0
Election Commission
Election Commission : उमेदवारांचा खर्च दणक्यात; सुजय विखे ५४ लाख, तर नीलेश लंके ३१ लाख खर्च

Election Commission : नगर : नगर, शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (ता. १३) राेजी मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली. त्यापूर्वी ४८ तास अगोदर प्रचाराच्या ताेफा थंडावल्या हाेत्या. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून प्रचारासाठी किती खर्च केला. याची आकडेवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) जाहीर केली आहे. त्यानुसार महायुतीचे उमेदवार डाॅ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) व सदाशिव लोखंडे यांनी सर्वाधिक खर्च केल्याचे दिसून येते.

नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती? ना घर, ना कार, ना जमीन वाचा सविस्तर

नीलेश लंके यांचा खर्च ३१ लाख रुपये

नगर लोकसभा मतदारसंघातील सुजय विखे पाटील यांनी ५४ लाख ६० हजार रुपये खर्च केल्याचे सादर केले आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चात ८४ हजारांची तफावत आली होती. नीलेश लंके यांनी ३१ लाख रुपये खर्च केल्याची माहिती दिली आहे, तर यात एक लाख ६५ हजारांची तफावत दिसून आली.

हे देखील वाचा: ‘सगेसोयरेसाठी’ ४ जूनपासून पुन्हा आंदोलन; मनोज जरांगेंनी उपसलं उपोषणाचं हत्यार

सदाशिव लोखंडे यांनी खर्च केले ५४ लाख रुपये (Election Commission)

दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांनी ५४ लाख रुपये खर्च केल्याचे सादर केले. यामध्ये निवडणूक विभागाला २९ लाख २१ हजार रुपयांची तफावत दिसून आली होती. भाऊसाहेब वाकचौरे यांनी ३२ लाख २४ हजार रुपये खर्च केल्याचे दिसून येते आहे. तर त्यांच्या खर्चात ५ लाख १९ हजार रुपयांची तफावत आली. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खर्च करण्यासाठी ९५ लाखांची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. उमेदवारांच्या प्रचार, सभा, रॅलीवर निवडणूक विभागाचे लक्ष होते. उमेदवाराच्या खर्चाची तपासणी करण्यासाठी ३, ७ आणि ११ मे असे तीन दिवस ठरवून देण्यात आले होते. या दिवशी उमेदवारांना खर्च सादर करणे बंधनकारक होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here