Election Commission : निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी

0
Election Commission

Election Commission : श्रीगोंदा: मतदान केंद्राचे (Polling Booth) सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करावी. पुरेसा सुर्यप्रकाश, रस्ते, विद्युत जोडणी, प्रकाश व्यवस्था यादृष्टीने नियोजन करावे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षा यांच्या सर्व उपाययोजना करा. मतदारांची (Voter) कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या.

नक्की वाचा: मोठी बातमी!शंकरराव गडाख यांच्या साखर कारखान्याला आयकर खात्याची नोटीस

श्रीगोंदा मधील मतदान व मतमोजणी ठिकाणाची पाहणी

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ २२६ मधील मतदान केंद्रांची, ईव्हीएम सुरक्षा कक्षाची व मतमोजणी ठिकाणाची पाहणी केली व विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तात्काळ दुरुस्ती डागडुजी करावी. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधा पुरविण्याबाबत निर्देश देत चूकमुक्त निवडणुकीची संपूर्ण तयारी प्रत्येक मतदारसंघात करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिल्या.

अवश्य वाचा: ‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; अजित पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार?

कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक सूचना (Election Commission)

तहसील कार्यालय, फिरते तपासणी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, यांचा आढावा घेत कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रुम, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती ठिकाण आणि मतदान यंत्र ठेवलेल्या ठिकाणांना भेटी दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गौरी सावंत,तहसिलदार डॉ. क्षितिजा वाघमारे, गट विकास अधिकारी राणी फराटे, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, निवडणूक नायब तहसिलदार पंकज नेवसे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे उपस्थित होते.