Election Commission of India : कर्जत-जामखेड मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू

Election Commission of India

0
Election Commission of India : कर्जत-जामखेड मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू
Election Commission of India : कर्जत-जामखेड मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम सुरू

Election Commission of India : कर्जत : भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निर्देशानुसार २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात (Karjat-Jamkhed Legislative Assembly Constituency) विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. मतदारांनी (Voters) यात सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच बीएलओ यांना सत्य माहिती देत मतदार याद्या शुद्ध आणि अद्यावत करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन कर्जत प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.

नक्की वाचा : आता गॅस सिलिंडरचा पुरवठा होणार सुरळीत; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

अंतिम यादीतील मतदारांची पडताळणी

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अनुषंगाने सध्याच्या मतदार यादीतील मतदारांचे यापूर्वी झालेल्या सन २००२ विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाच्या अंतिम यादीतील मतदारांची पडताळणी करण्याबाबत कार्यवाही चालू आहे. यासाठी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदान केंद्र निहाय मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9

आवश्यक ती माहिती देण्याचे आवाहन (Election Commission of India)

महसूल भागातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांची पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तरी कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांनी आपली व आपल्या कुटुंबाबाबत माहिती विचारणा केल्यास त्यांना आवश्यक ती माहिती द्यावी.

यासह ज्या मतदारांची नावे सन २००२ च्या मतदार यादीत आहेत त्यांची नावे सन २०२४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदारयादीत आहेत त्यांचे स्वयं पडताळणी आवश्यक आहे. तसेच ज्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत नाहीत परंतु २०२४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या यादीत नाव आलेले आहे त्यांची पडताळणी करताना त्यांच्या वडिलांची माहिती सन २००२ च्या यादीतील (वडिलांचे विधानसभा मतदार संघ, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक) नमूद करून पडताळणी पार पडणार आहे.

त्यामुळे विवाहित महिला/ सुन यांची पडताळणी करताना त्यांच्या वडिलांच्या विधानसभा मतदार संघ, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक अशी माहिती बीएलओ यांना देण्यास नागरिकांनी सहकार्य करावे. त्यासाठी विवाहित महिलांच्या वडिलांच्या इपिक मतदार ओळ्खपत्राची प्रत उपलब्ध ठेवावी. जेणेकरून मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम बिनचूक व तंतोतंत होईल असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील, कर्जत तहसीलदार रवी सतवन यांनी केले आहे.