Sharad Pawar: निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा;’पिपाणी’चिन्ह गोठवले

विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस असा चिन्हांचा उल्लेख पाहायला मिळणार आहे. नुकताच या संदर्भात निवडणूक आयोगात निर्णय आल्याची माहिती समोर आली आहे.

0
Sharad Pawar : निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा;'पिपाणी' चिन्ह गोठवले
Sharad Pawar : निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा;'पिपाणी' चिन्ह गोठवले

नगर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान (Loksabha Election) शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिपाणी या चिन्हामुळे चांगलाच फटका बसला होता. अनेक ठिकाणी तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस यावरून गोंधळ उडाल्याने शरद पवार गटाला मिळणारी मते वेगळ्याच उमेदवाराला मिळाल्याच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत शरद पवार गटाने याबाबत निवडणूक आयोगासमोर (Election Commission) ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवावा, अशी मागणी केली होती. ती मागणी आता निवडणूक आयोगाने मान्य केल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : शेतकऱ्यांच्या खात्यावर इतक्या काेटीचा पीक विमा जमा हाेणार; निलेश लंकेंच्या पाठपुराव्याला यश

ट्रम्पेटचा उल्लेख तुतारीऐवजी ट्रम्पेट असाच ठेवण्याला मान्यता (Sharad Pawar)

लोकसभा निवडणुकीत तुतारी या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मते तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाऐवजी ट्रम्पेटला मिळाली होती. लोकसभेला ट्रम्पेटचा उल्लेख तुतारी असा करण्यात आला होता. या विरोधात निवडणूक आयोगात पक्षाने दाद मागितल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवण्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीत ट्रम्पेट आणि तुतारी वाजवणारा माणूस असा चिन्हांचा उल्लेख पाहायला मिळणार आहे. नुकताच या संदर्भात निवडणूक आयोगात निर्णय आल्याची माहिती समोर आली आहे.

अवश्य वाचा : मोठी बातमी! वारकऱ्यांना मिळणार पेन्शन

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल (Sharad Pawar)

पिपाणी चिन्हामुळे निवडणुकीमध्ये आम्हाला फटका बसल्याची भावना व्यक्त करत हे चिन्ह रद्द करण्यात यावे,अशी मागणी निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केली होती. त्यांच्या या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवलं आहे. बारामतीत एका अपक्ष उमेदवाराला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिलं होतं. त्यावर शरद पवार गटाने आक्षेप घेतला होता. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख या अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ हे चिन्ह देण्यात आले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून यावर आक्षेप घेण्यात आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here