Elections : अहिल्यानगर : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Elections) लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) हे प्रकरण प्रलंबित आहे. यातच आज पुन्हा निवडणूका आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. राज्य सरकारने (State Government) कोर्टाला सागितलं की हा विषय पूर्ण झाला आहे. कुठल्याही पक्षात मतभेद नाहीत. 5 फेब्रुवारी सुरुवातीला कोर्ट म्हणाल होत मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत. त्यामुळं आता कोर्टाने 25 फेब्रुवारी तारीख दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार असल्याची चिन्ह आहेत.
नक्की वाचा : महाकुंभला जाण्यासाठी विमान तिकिटे स्वस्त होणार;उड्डाण मंत्रालयाचा निर्णय
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा रखडल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. या याचिकेच्या माध्यमातून न्यायालयात निवडणुका घेण्यासंदर्भात विनंती करण्यात आली. ओबीसी आरक्षण असो किंवा नसो पण निवडणुका व्हाव्यात, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली आहे.
अवश्य वाचा : सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर
पुढील सुनावणीसाठी २५ फेब्रुवारीला (Elections)
सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणीसाठी २५ फेब्रुवारीची तारीख दिली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. यासाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी देखील सुरु झाली आहे. पण राजकीय धुरीणांसह जनतेला निवडणुकीची पुढील काही काळ वाट पाहावी लागणार आहे.