Elections : अहिल्यानगर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका (Elections) संदर्भात आज (ता.४) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी झाली. राज्यातील रखडलेल्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. यावेळी राज्य सरकारकडून (State Government) तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे. दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे कोर्टाने कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सुनावणी करु, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह स्थानिक नेत्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामळे या निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी ६ मे रोजी होणार आहे.
अवश्य वाचा : लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पुढे ढकलण्यात आली
पुणे, मुंबईसह अनेक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये ३ ते ४ वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज सुरु आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता या निवडणुकांकडे लागले आहे. लोकसभेपाठोपाठ राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या हालचाली सुरु होतील, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या आहे.
नक्की वाचा : पूर्ववैमनस्यातून अपहृत तरुणाचा खून; आणखी पाच आरोपी ताब्यात
याचिका कशासाठी दाखल आहे? (Elections)
ओबीसी आरक्षणचा विषयावरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. त्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली नाही. राज्य सरकार आणि आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे याचिकाकर्ते या दोघांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हव्या आहेत. परंतु काही मुद्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.