Elections : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपालिका, नगरपंचायतची निवडणूक जाहीर 

Elections : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपालिका, नगरपंचायतची निवडणूक जाहीर 

0
Elections : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपालिका, नगरपंचायतची निवडणूक जाहीर 
Elections : अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ नगरपालिका, नगरपंचायतची निवडणूक जाहीर 

Elections : नगर : नगरपालिका व नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीचा (Elections) बिगुल वाजला असून २ डिसेंबरला मतदान (Voting) होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) आज (ता. ४) सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी ही माहिती दिली. यात अहिल्यानगर जिल्ह्यातील ११ नगरपालिका व एक नगरपंचायतचा समावेश आहे.

अवश्य वाचा : श्रीरामपुरात महायुतीला धक्का; नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

या नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

या निवडणुकीत राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. या निवडणुकीतून २८८ अध्यक्ष २४६ नगरपालिकांमध्ये १० नवीन नगरपालिका आहेत. तर ४२ नगरपंचायतींमध्ये १५ नवीन नगरपंचायती आहेत. यात नेवासा नगरपंचायत तर कोपरगाव, संगमनेर, शिर्डी, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, श्रीरामपूर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा व जामखेड या नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

नक्की वाचा : नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण;मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

२ डिसेंबरला मतदार तर ३ डिसेंबरला मतमोजणी (Elections)

निवडणूक कार्यक्रमानुसार दोन डिसेंबरला मतदार तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.  त्यानुसार आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षांतराचे वारे मागील आठवड्याभरापासून वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, १४ पंचायत समित्या व एक महापालिकेची निवडणूकही होणार आहे.

२४६नगर परिषद, ४२ नगर पंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर
२ डिसेंबर मतदान
३ डिसेंबर निकाल

७ नोव्हेंबर मतदार याद्या प्रसिद्ध होतील
१० नोव्हेंबर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात
१७ नोव्हेंबर नामनिर्देशन पत्र दाखल शेवटची तारीख
नामनिर्देशन पत्र छाननी १८ नोव्हेंबर
अपील नसलेल्या ठिकाणी
नामनिर्देशन पत्र परत घेण्याची तारीख २१ नोव्हेंबर

अपील असलेल्या ठिकाणी
नामनिर्देशन पत्र परत घेण्याची तारीख २५ नोव्हेंबर

निवडणूक चिन्हासह अंतिम उमेदवार यादी २६ नोव्हेंबर