Elections : नगर : शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडे युवकांचा ओढा वाढत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून, राज्यासह जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Elections) गावपातळीवर पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून, या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद सर्वांना समजणार आहे. युवाशक्ती हीच शिवसेनेची खरी ताकद असल्याचे, प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे (Anil Shinde) यांनी केले आहे.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
शिवसेनेच्या दक्षिण उपजिल्हाप्रमुखपदी श्रावण काळे यांची निवड
शिवसेनेच्या दक्षिण उपजिल्हाप्रमुखपदी भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते श्रावण बाळासाहेब काळे यांची निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख दिलीप सातपुते, ओंकार सातपुते, महेश शेवते, आकाश पवार, नितीन साळवे, विजय साळवे, गौरव शिंदे, तालुकाप्रमुख अजित दळवी, चेतन काळे, सौरभ गिरी, सिद्धू काळे, सत्यम वाकळे, आकाश पवार, ओमकार थोरात, शिवम वाकळे, प्रवीण गायकवाड, पवन शेळके, शक्ती काळोखे, नितीन सुरसे, वैभव चहाल आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
दिलीप सातपुते म्हणाले की, (Elections)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेकडे युवक आकर्षित होत आहेत. गाव तेथे शाखा अभियान राबविण्यात आलेले असल्याने मोठ्या संख्येने युवक वर्ग शिवसेनेला जोडला गेला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या शिवसेनेची वाटचाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थपणे पुढे नेत आहेत.
श्रावण काळे यांनी दक्षिणेत शिवसेना पक्षाला सर्वसामान्य वर्गाला जोडून घेण्यासाठी कार्य केले जाणार आहे. ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी पक्ष सातत्याने काम करत असून, अनेक कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्यांना आधार मिळाला आहे. हेच ध्येय-धोरण ठेऊन कार्य करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.



