Electric Buses : नगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध हाेणार; नगरकरांना प्रतीक्षा

Electric Buses : नगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध हाेणार; नगरकरांना प्रतीक्षा

0
Electric Buses : नगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध हाेणार; नगरकरांना प्रतीक्षा
Electric Buses : नगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध हाेणार; नगरकरांना प्रतीक्षा

Electric Buses : नगर : देशभरात पीएम ई-बस (Electric Buses) सेवा योजनेंतर्गत नगर शहरासाठी ४० ई-बसेस उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी महापालिकेला चार्जिंग स्टेशन (Charging station) उभारावे लागणार आहे. चार्जिंग स्टेशनसाठी महापालिकेने केडगाव येथील जागा निश्चित केली आहे. तेथे वीज भार मंजूर झालेला आहे. मात्र, सोनेवाडी सब स्टेशन पासून महापालिकेच्या (Municipality) सबस्टेशनपर्यंत अद्याप विजेचा पुरवठा करणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे या चार्जिंग स्टेशनची उभारणी रखडली आहे. परिणामी, ई-बससाठी नगरकरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अवश्य वाचा : नीलेश लंकेंनी इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ

१६९ शहरांना तब्बल १० हजार ई-बसेस

पीएम ई-बस सेवा योजनेसाठी केंद्र सरकारने १६ ऑगस्ट रोजी २० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून देशभरातील १६९ शहरांना तब्बल १० हजार ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

नक्की वाचा : अफगाणिस्तानने रचला इतिहास,बांगलादेशला घरचा रस्ता दाखवत केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

नगर शहराला गरजेनुसार ४० बसेस (Electric Buses)

२० ते ४० लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी १५०, १० ते २० लाख व ५ ते १० लाख लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी १०० व ५ लाखांच्या आतील लोकसंख्येच्या शहरात प्रत्येकी ५० पर्यंत ई-बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नगर शहराला गरजेनुसार ४० बसेस उपलब्ध होणार आहेत. तसा प्रस्तावही मंजूर झालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here