Electric Shock : नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) तालुक्यातील जेऊर गावाच्या शिवारात सबस्टेशनमध्ये फिडर चेंज करत असताना विजेचा धक्का (Electric Shock) बसल्याने एका युवकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना २२ जुलै २०२३ रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल दोन वर्षानंतर बुधवार ता. ९ जुलै २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जे. के. एंटरप्रायजेस या खासगी ठेकेदार कंपनीच्या मालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड
कोणतीही सुरक्षा साधने पुरविली नाही
अभिजित कदम (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जेऊर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्तात्रय राधाकिसन आहेर (वय २२, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) हा बाह्य स्रोत यंत्रचालक म्हणून जेऊर सबस्टेशनमध्ये कार्यरत होता. ठेकेदार अभिजित कदम याने दत्तात्रय आहेर या युवकाला सुरक्षाविना फिडर चेंज करण्याचे काम दिले होते.
अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा
एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (Electric Shock)
कोणतीही सुरक्षा साधने न पुरवता अत्यंत निष्काळजीपणाने काम घेतल्यामुळे फिडर चेंज करताना दत्तात्रय याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दत्तात्रय याचे वडिल राधाकिसन तुकाराम आहेर (वय ४९, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.