Electricity : संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; शेतकरी संतप्त

Electricity : संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; शेतकरी संतप्त

0
Electricity : संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; शेतकरी संतप्त
Electricity : संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; शेतकरी संतप्त

Electricity : संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या मागील 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी तालुक्यातील शेतकरी (Farmer) व सर्वसामान्य नागरिकांसाठी सातत्याने काम केले. जनतेला कोणत्याही प्रश्नाबाबत मागणी करावी लागली नाही. अगोदरच अडचणी सोडवल्या गेल्या. मात्र, आता मागील तीन महिन्यातच तालुक्यातील विजेचा (Electricity) खेळखंडोबा झाला असून त्यामुळे पाणी उचलता येत नाही आणि हे पाणी पूर्वेला नेले जात असल्याची संतप्त व्यथा तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यापुढे मांडल्या.

नक्की वाचा : पुणे अत्याचार प्रकरण;आरोपी दत्तात्रय गाडेच्या अटकेची A टू Z स्टोरी

थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या मांडल्या समस्या

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तालुक्यातील विविध गावांमधील नागरिकांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापुढे वीज व पाण्याबाबतच्या समस्या मांडल्या. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, पांडुरंग घुले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘पुण्यातील अत्याचाराच्या घटनेत आरोपीवर कठोर कारवाई होईल’- एकनाथ शिंदे

आपल्या भावना मांडताना संतप्त शेतकऱ्यांनी म्हटले की (Electricity)

यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना मांडताना म्हटले आहे की, मागील तीन महिन्यापासून प्रवरा नदीकाठी तसेच पठार भागामध्ये विजेचा पूर्ण खेळखंडोबा झाला आहे. पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे. मात्र, असे न होता अगदी चार तास लाईट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नदीचे पाणी उचलता येत नाही.

Electricity : संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; शेतकरी संतप्त
Electricity : संगमनेर तालुक्यात विजेचा खेळखंडोबा; शेतकरी संतप्त


यावेळी थोरात म्हणाले, आश्वी येथे अपर तहसील कार्यालय करून संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा त्यांचा डाव आहे. याबाबत नवीन लोकप्रतिनिधीला काही माहीत नाही. तहसीलदार असा निर्णय कसा घेतात, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे, ते त्यांनी सांगितले पाहिजे. जनतेचा दबाव वाढला म्हणून आता महसूल मंडळाची फेररचना करणार, असे सांगत आहेत. तालुक्याची अर्थव्यवस्था मोडण्याचा त्यांचा डाव आहे. चुकीच्या कामांबाबत सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. जनतेचा दबाव त्यांच्यावर राहिला पाहिजे. तालुक्यातील प्रत्येक गावाला पाणी देण्याचे आपले नियोजन होते, त्यासाठी आपण काम केले. अडचणी येण्यापूर्वीच त्या सोडवल्या जायच्या. त्यामुळे मागील 40 वर्षात जनतेला या गोष्टी कळाल्या नाही. आता संघर्ष करावा लागणार आहे, त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन दबाव ठेवला पाहिजे असे ते म्हणाले.


यानंतर सर्व शेतकऱ्यांनी तीन तारखेला वीज अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून जर आठ दिवसांमध्ये पूर्ण दाबाने पूर्णवेळ वीज मिळाली नाही तर मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला.