Electricity : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील गावामध्ये बिबट्या (Leopard) तसेच इतर हिंसक प्राण्यांचा वाढता वावर पाहता शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतीकामासाठी जाण्यास असमर्थ आहेत. शासन आणि महावितरणाने (Mahavitaran) विभागाने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा (Electricity) पूर्ण दाबाने द्यावा, अशी मागणी होत आहे.
अवश्य वाचा : श्री क्षेत्र मोहटा देवी ट्रस्टच्या नूतन विश्वस्त मंडळाची घोषणा
महावितरणच्या अभियंत्याकडे निवेदनाद्वारे मागणी
याबाबत महावितरणाचे अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे, तालुका अध्यक्ष शरद पवार, अरुण म्हस्के, भरत बोरवे, चंद्रकांत पवार, गणेश तोडमल, महेश शेळके, युवराज हजारे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात महायुतीमध्ये फूट; नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार
सुरक्षेचा धोका अधिक गंभीर (Electricity)
दिवसा होणाऱ्या अल्प वीजपुरवठामुळे सिंचनाचे काम अर्धवट राहते, पिकांची वाढ बाधित होते आणि सुरक्षेचा धोका अधिक गंभीर बनतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर केलेला दिवसा आठ ते दहा तासांचा पूर्णवेळ वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.
तसेच, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून रात्रीचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद ठेवावा आणि दिवसा स्थिर, अखंड वीज उपलब्ध करावी, असा आग्रहही पक्षाने व्यक्त केला आहे. यासोबतच वीज पुरवठ्यातील अनियमितता, लोडशेडिंग, कमी व्होल्टेज यांसारख्या समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच शेतकऱ्यांना अचूक वीज वेळापत्रकाची माहिती उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.



