Electricity bill : ग्राहकांच्या सुविधेसाठी सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्र सुरू

Electricity bill

0

Electricity bill : नगर : ग्राहकांना वीजबिलाचा (Electricity bill) भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी शुक्रवार, शनिवार व रविवारी २९, ३० व ३१ मार्च २०२४ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र (Electricity Bill Payment Centre) सुरु ठेवण्याचे निर्देश नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यातील महावितरणचे (Mahavitaran) सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार असून या सुविधेसह डिजिटल (digital) माध्यमातून ग्राहकांनी आपल्या चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Electricity bill

हे देखील वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार

सुट्टीच्या दिवशीही वसुली सुरु

ग्राहकांच्या सोयीसाठी वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यासोबतच थकीत वीजबिल वसुलीसाठीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी वीज पुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी आपल्या विदुयत बिलाचा भरणा वेळेत करावा. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अॅप वर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते.

Mahavitaran
Mahavitaran : महावितरण : नवीन वीजजोडणी तातडीने उपलब्ध होणार

नक्की वाचा: तीन पिढ्यांचा संसार जमीनदोस्त; बेघर झालेल्यांना अश्रू अनावर

क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट (Electricity bill)

याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट वॉलेटचा (पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते, या डिजिटल माध्यमांचा वापर करून घरबसल्या वीजबिल भरता येईल. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here