Electricity Bill : बळीराजा माेफत वीज याेजनेची अंमलबजावणी; शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

Electricity Bill : बळीराजा माेफत वीज याेजनेची अंमलबजावणी; शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

0
Electricity Bill : बळीराजा माेफत वीज याेजनेची अंमलबजावणी; शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण
Electricity Bill : बळीराजा माेफत वीज याेजनेची अंमलबजावणी; शेतकऱ्यांना वीजबिलांच्या पावतीचे वितरण

Electricity Bill : नगर : मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वीजबिलांच्या (Electricity Bill) पावतीचे वितरण आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेंतर्गत आस्थापित कृषिपंपाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते नुकतेच छत्रपती संभाजीनगर येथे झाले. यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट आदी उपस्थित हाेते.

नक्की वाचा: विकासकामांच्या आड येणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,

”मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत राज्य सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपांचे चालू बिल भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे. आगामी पाच वर्षे सरकार शेतकऱ्यांचे साडेसात एचपीपर्यंतच्या पंपांचे चालू बिल भरेल, असा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारने एप्रिल ते जून या कालावधीच्या बिलापोटी २ हजार ७५० कोटी रुपये महावितरणला अदा केल्यामुळे शेतकऱ्यांना महावितरणकडून पावत्या पाठविण्यात येत आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात पावत्या प्रदान करण्यात आल्या. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या या योजनेत राज्य सरकार कृषी पंपांचे चालू बिल भरत आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांच्या वीज बिलापोटी प्रतिकात्मक धनादेश महावितरणला सुपूर्द केला. महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा धनादेश स्वीकारला. यावेळी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला उपस्थित होत्या.

अवश्य वाचा: ‘त्यांची नियत खराब होती,म्हणून त्यांच्या हातून अनावरण झालेला पुतळा कोसळला’,राहुल गांधींची टीका

शेतकऱ्यांना दहा लाख पंप देणार : फडणवीस (Electricity Bill)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना दहा लाख पंप देण्यात येणार आहेत. केवळ दहा टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनल्स आणि कृषी पंप मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमातींच्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के भरावा लागेल. ऊर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. शेतकऱ्यांना स्वतंत्र आणि हक्काचे सिंचनाचे साधन सौर कृषी पंपामुळे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना २५ वर्षे वीजबिल नाही. पाच वर्षांत पंप बिघडला तर दुरुस्त करून मिळणार आहे.”