Electricity Bill : राज्यात वीज स्वस्त होणार; प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

0
Electricity Bill : राज्यात वीज स्वस्त होणार; प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?
Electricity Bill : राज्यात वीज स्वस्त होणार; प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

Electricity Bill: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यभरातील वीज दरांमध्ये कपात (Reduction in Electricity Rates) करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांसाठी हे नवीन आर्थिक वर्ष दिलासादायक ठरणार आहे. १ एप्रिलपासून हे नवीन दर लागू (New Rates from April 1st) होणार आहेत. महावितरण, बेस्ट, अदानी आणि टाटा पॉवर या कंपन्यांनी घरगुती वीज दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः बेस्ट प्रशासनाने कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त दरात वीज (Cheap electricity) देण्याचा निर्णय घेतला आहे.

नक्की वाचा: सहा वर्षाच्या मणिकर्णिकाची ‘केदारकंठ’ शिखराला गवसणी

नवीन वीजदर लागू करण्याचा प्रस्ताव (Electricity Bill)

महावितरण, अदानी, बेस्ट आणि टाटा या वीज वितरण कंपन्यांनीच नवीन वीजदर लागू करण्याबाबत एक प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे पाठवला होता. या प्रस्तावाला राज्य वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली. या मंजुरीनंतर वीज दरात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अवश्य वाचा: आता गरजू कुटुंबाला मिळणार प्रत्येकी ३ लिटर रॉकेल ; जिल्ह्यासाठी २१६ किलोलिटर साठा मंजूर

वीज बिल किती रुपयांनी कमी येईल ? (Electricity Bill)

२०२६-२७ या आर्थिक वर्षात ० ते १०० युनीटसाठी ४.३ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ४.७६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात ९.७ टक्के कपात करण्यात आली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात १०१ ते ३०० युनीटसाठी ७.१ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी ७.९६ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १०.८ टक्के कपात केली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात ३०१ ते ५०० युनीटसाठी ११.६४ रुपये द्यावे लागणार आहेत.

२०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १३.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १४ टक्के कपात करण्यात आली आहे. तर, २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५०० पेक्षा युनीटसाठी १२.६४ रुपये द्यावे लागणार आहेत. २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी याच युनीटसाठी १४.५५ रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच वीज दरात १३.१ टक्के कपात करण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जेव्हा विजेचा वापर वाढतो, तेव्हा वीज दरात झालेली ही कपात सर्वसामान्यांसाठी मोठी आर्थिक मदत ठरणार आहे.