Electricity Distribution : वीज वितरणच्या विरोधात तिसगाव ग्रामस्थ आक्रमक; खुर्चीला हार घालत व्यक्त केला संताप 

Electricity Distribution : वीज वितरणच्या विरोधात तिसगाव ग्रामस्थ आक्रमक; खुर्चीला हार घालत व्यक्त केला संताप 

0

Electricity Distribution : पाथर्डी : गेल्या तीन दिवसात एकूण ६६ तास वीज गायब झाल्याने संतप्त झालेल्या तिसगावच्या (Tisgaon) ग्रामस्थांनी शनिवार (ता.४) पाथर्डी शहरातील वीज वितरण (Electricity Distribution) कंपनीच्या कार्यालयात गांधीगिरी आंदोलन (Protest) करत अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत आपला संताप व्यक्त केला. 

नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणून तिसगावची ओळख

पाथर्डी शहारा पाठोपाठ मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणून तिसगावची ओळख आहे. मात्र, गेल्या तीन दिवस विजेचा खेळखंडोबा झाल्याने शनिवार (ता. ४) युवानेते भाऊसाहेब लवांडे यांच्यासह अरुण रायकर, भारत गारुडकर, अस्लम शेख, मन्सूर फकीर, वहाब इनामदार, शरद खंडागळे,अंबादास शिंदे,नवनाथ लोखंडे, मेहताब पठाण, नवनाथ भडके, शकील सय्यद, राजेंद्र बनकर, फिरोज पठाण, ऋषिकेश स्वामी हे वीजवितरण कंपनीच्या कार्यालयात आले मात्र, एकही सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शीतपेय विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान (Electricity Distribution)

यावेळी बोलताना लवांडे म्हणाले की, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका तिसगाव येथील ग्रामस्थ व व्यावसायिकांना बसला आहे. तीन दिवस वीज गायब झाल्याने शीतपेय विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास होत आहे. अधिकाऱ्यांना फोन लावला की ते  उडवाउडवीची उत्तरे देतात तर, काही वेळेस अधिकारी नॉटरीचेबल असतात. येथून पुढील काळात सुरळीत वीजपुरवठा केला नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.