Encroachment : पारनेर : सुपा-पारनेर रस्त्यावरील दुतर्फा असलेली अनधिकृत बांधकामे, टपऱ्या या परिसरातील पक्की बांधकामे अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करत पाडण्यात आली. अतिक्रमण (Encroachment) धारकांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतला होता. अनेकांनी कारवाई पूर्वीच आपली अतिक्रमणे काढली होती. प्रशासनाच्या (Administration) या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. सुपा पारनेर रस्त्यावरील अनधिकृत (Unauthorized) अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. या अतिक्रमणं धारकांना वारंवार नोटीस देऊनही काही अतिक्रमणे काढली जात नव्हती. आज अखेर सर्व समावेशक कारवाई करत अतिक्रमणं हटाव मोहीम फत्ते करण्यात आली. आतापर्यंत टपऱ्या, पक्की बांधकामे यांची अतिक्रमणे हटवण्यात आली. या मोहिमेमुळे सुपा-पारनेर रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही पहा : निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये घोटाळा केला; तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री सुबोध सावजी
पोलीस बंदोबस्तात टाकण्यात आला हातोडा (Encroachment)
नगर-पुणे रस्त्यावरील सुपा औद्योगिक परीसर व बस स्थानक परिसर व सुपा पारनेर रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे व टपऱ्या आस्थापनाची कार्यालये तसेच इतर अनधिकृत बांधकामावर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकण्यात आला. एम आय डी सीचे अधिकारी तसेच महसूल प्रशासन यांचे वरिष्ठ अधिकारी अतिक्रमणं विरोधी पथक आणि बांधकाम विभाग कर्मचारी यांनी ही कारवाई केली. गेल्या अनेक वर्षापासून हा अतिक्रमणाचा प्रश्न आणि त्याबाबत तक्रारी होत्या. रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमणं आणि त्या मूळे वाहतुकीला झालेला अडथळा हा मोठा विषय होता. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असतानाच या अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आला. काही अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणं काढली. या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांसह परिसरात मोठी धावपळ उडाली.
नक्की वाचा : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले
बांधकाम विभाग व महसूल विभागाचे वतीने मोहीम (Encroachment)
सुपा बसस्थानक पासुन ते पारनेर रोड पर्यंतची अतिक्रमण काढण्याची कारवाईसुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे. सुपा पारनेर रोड वरील रस्त्यांवर अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी यांनी या आधीच सर्व अतिक्रमणं धारकांना नोटीस बजावली होती. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण रेषा आखून दिली होती. तरीही अतिक्रमणं काढले गेले नसल्याने आज सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाचे वतीने मोहीम राबवली गेल्याची माहिती नगर पारनेर तालुक्याचे प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी दिली.