Encroachment : नगर : अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौकात असलेल्या अनाधिकृत अतिक्रमणावर (Encroachment) महापालिकेच्या (AMC) पथकाने कारवाई करत पत्र्याच्या टपऱ्या भुईसपाट केल्या आहेत. ही कारवाई आज (ता. ३१) सकाळी दहा वाजता करण्यात आली. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका, कोतवाली पोलिसांनी (Kotwali Police Station) संयुक्तपणे कारवाई सुरू केली आहे.

अवश्य वाचा: युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार
पक्के अतिक्रमण पथकाने कारवाई करून हटवले
अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक तसेच चाणक्य चौक परिसरात महापालिकेच्या जागेत करण्यात आलेले पक्के अतिक्रमणावर अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई करून अतिक्रमणे हटवले. तेथील पत्र्याच्या शेड, ऑफीस केबिन जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात येत आहे.

नक्की वाचा : आमदार संग्राम जगताप झाले संतप्त; स्वच्छता निरीक्षकांची घेतली झाडाझडती
महापालिकांच्या जागांवरील अतिक्रमणांचा घेतला आढावा (Encroachment)
शहरातील महापालिकांच्या जागांवरील अतिक्रमणांचा आढावा घेतला जात आहे. टप्प्याटप्प्याने या जागांवरील अतिक्रमणे कारवाई करून हटवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई उपायुक्त संतोष टेंगळे, अतिक्रमण विरोधीपथकाचे प्रमुख सुरेश इथापे, मनपा कर्मचारी रिजवान शेख, अमोल कोतकर, एस. बी. तडवी, रमेश कोतकर, दत्ता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.



