
Encroachment Removal Campaign : श्रीगोंदा: तालुक्यातील काष्टी येथे अहिल्यानगर दौंड महामार्गालगत (Ahilyanagar Daund Highway) असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्याची मोहीम मंगळवारी (ता.२३) सुरु करण्यात आली. महामार्गालगत असलेले अतिक्रमण हटविल्याने (Encroachment Removal Campaign) मुख्य रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (Maharashtra State Road Development Corporation) व श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली. काष्टी ग्रामपंचायतीने याबाबत पाठपुरावा केला होता.
अवश्य वाचा : अहिल्यानगरच्या ‘एसबीआय’च्या मुख्य शाखेत ३ कोटी ७७ लाखांचा अपहार; गुन्हा दाखल
आठवडे बाजाराच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी
अहिल्यानगर दौंड या महामार्गालगत काष्टी येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यातच काष्टी हे तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्याने येथे सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. येथे राज्यात नावाजलेला जनावरांचा तसेच आठवडे बाजार प्रत्येक शनिवारी भरत असतो त्या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती.
नक्की वाचा : अहिल्यानगर शहरात बंधू-भावाचे वातावरण दिसत नाही : माजी मंत्री थोरात
दोन वर्षापासून कारवाई रखडली (Encroachment Removal Campaign)
महामार्गांलगत झालेल्या मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने काष्टी ग्रामपंचायतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. मात्र, मागील दोन वर्षापासून कारवाई होत नव्हती. सातत्याचा होत असलेला पाठपुरावा यामुळे मंगळवारी (ता.२३) रस्ते विकास महामंडळाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. यामध्ये पादचारी मार्गावरील अतिक्रमणे तसेच रस्त्यालगतची सुमारे अडीच मीटर आतील अतिक्रमणे हटविण्यात आली. बहुतांश अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढल्याची माहिती मिळाली.


