Energy Conservation : नगर : ऊर्जा संवर्धन (Energy Conservation) सप्ताहाच्या निमित्ताने महावितरण (Mahavitaran) व महाऊर्जा (Mahaurja) मार्फत २० डिसेंबर रोजी जनजागृती रॅली काढण्यात येणार असून या रॅलीत विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक अमोल बनसोडे व महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण यांनी केले आहे.
नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस
उर्जेचा कार्यक्षम वापर कसा करावा याबाबत दिली माहिती
ऊर्जासंवर्धनाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम सप्ताह राबविण्यात येत आहे. शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी औद्योगिक, व्यापारी, तसेच घरगुती ग्राहकांसाठी ऊर्जा संवर्धनाच्या उपायांवर आधारित ध्वनी चित्रफिती ऊर्जा चित्ररथावर दाखविण्यात आल्या. यात सौरऊर्जेचा उपयोग, एलईडी बल्बचा वापर, तसेच उर्जेचा कार्यक्षम वापर कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली.
अवश्य वाचा : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
‘ऊर्जासंवर्धन व पर्यावरण संवर्धन’ या विषयावर स्पर्धा (Energy Conservation)
ऊर्जा संवर्धन सप्ताहअंतर्गत विविध शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ऊर्जासंवर्धन व पर्यावरण संवर्धन’ या विषयावर निबंध, पोस्टर, व वक्तृत्व स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. महाऊर्जा (पुणे) चे महासंचालक कादंबरी बलकवडे व नाशिक विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.