England King Charles : अकोले : आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खडकी (देवठाण) येथील इतिहास (History) अभ्यासक विकास मुरलीधर पवार यांना इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स (England King Charles) यांनी आभाराचे पत्र पाठवले आहे. त्यांनी लिहिलेल्या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) निर्मितीचा कथा इतिहास ‘द सागा ऑफ ह्यूज विल्सन डॅम’, ‘द सेंच्युरी ऑफ द लेक ऑर्थर हिल भंडारदरा अँड अँन एपिस्टोलरी डायलॉग विथ हर मॅजिस्टी द क्वीन ऑफ इंग्लंड’ या पुस्तकाबद्दल त्यांचे कौतुक केले.
नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय
इंग्लंडच्या महाराणींजवळ कृतज्ञता व्यक्त करणारा पत्ररुपी संवाद
या पुस्तकात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाच्या कुशीत निर्माण केलेल्या आणि अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेषा असलेल्या प्रवरा नदीवर बांधण्यात आलेल्या भंडारदरा धरणाची जीवनगाथा मांडण्यात आलेली आहे. ब्रिटीश राज्याचा अंमल असताना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्माण झालेल्या या धरण निर्मितीमुळे पाणीटंचाईने प्रभावित असलेला हा परिसर सुजलाम-सुफलाम झालेला आहे. त्याबद्दल इंग्लंडच्या महाराणींजवळ कृतज्ञता व्यक्त करणारा पत्ररुपी संवाद असा या पुस्तकाचा बाज आहे.

अवश्य वाचा : “मुख्यमंत्री साहेब,आरोपींना पाठीशी घालू नका,अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”- मनोज जरांगे
धरणाच्या निर्मितीचा इतिहास सांगणारे पुस्तक (England King Charles)
या धरणाची निर्मिती व येथील निसर्गसौंदर्य यावर विपूल प्रमाणात लिखाण होत असते, पण धरणाच्या निर्मितीचा इतिहास सांगणारे पुस्तक नव्हते. विकास पवार यांच्या पुस्तकाने ही उणीव दूर झाली आहे. ब्रिटीश राजवटीत १९१० मध्ये या धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली व १९२६ मध्ये ते पूर्ण झाले. धरण निर्मितीच्या या कहाणीत बांधकाम पूर्व सर्वेक्षणापासून तत्कालीन गव्हर्नरांच्या हस्ते झालेल्या उद्घाटनापर्यंतचा इतिहास यात सांगितला आहे. धरण बांधकामापूर्वी येथे झालेली सिंचनविषयक कामे, धरण सर्वेक्षणासाठी तत्कालीन अभियंत्यानी केलेले प्रयत्न आदींची माहितीही देण्यात आली आहे. त्यावेळेला पडलेले दुष्काळ, अकोले तालुक्यातील आदिवासी क्रांतीकारकांचे लढे, डेक्कन रॉयटस कमिशन आदी विषयांना स्पर्श करण्यात आलेला आहे. ब्रिटिशांनी या परिसरात बांधलेले रस्ते, पूल, इमारती, विश्रामगृहे यांचीही माहिती यात आहे. धरणामुळे लाभक्षेत्रात झालेले परिवर्तन, सहकारी चळवळीचा उदय आदी बाबींचाही उल्लेख पुस्तकात आहे. दरम्यान, ई साहित्य प्रतिष्ठान ठाणे यांनी सर्वप्रथम विकास पवार यांचे भंडारदरा धरण शतकपूर्ती प्रवास हे ई बुक २६ ऑगस्ट २०२० मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर लगेचच १४ एप्रिल २०२२ मध्ये भाग्योदय प्रकाशन कोल्हापूर यांनी प्रा. शिवनाथ तक्ते अनुवादित इंग्रजी भाषेत ‘द सेंच्युरी ऑफ द लेक ऑर्थर हिल’ पुस्तक प्रकाशित केले.