England vs India 3rd Test:भारत-इंग्लंड आज पुन्हा भिडणार;आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरुवात  

0
England vs India 3rd Test:भारत-इंग्लंड आज पुन्हा भिडणार;आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरवात  
England vs India 3rd Test:भारत-इंग्लंड आज पुन्हा भिडणार;आजपासून तिसऱ्या कसोटीला सुरवात  

England vs India 3rd Test : अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफी (Anderson-Tendulkar Trophy) या भारत व इंग्लंड कसोटी (India and England Test Match) मालिकेतील तिसरा सामना आजपासून (१० जुलै) सुरू होत आहे. हा सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानात (Lords Cricket Ground) खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरुवात होईल.

नक्की वाचा : मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंचा आत्महत्येचा प्रयत्न, कुलगुरुंवर केला गंभीर आरोप
भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी झालेली आहे. हेडिंग्लेला झालेला पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्सने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत ३३६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे आता दोन्ही संघात तिसऱ्या सामना जिंकण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. हवामान अंदाजानुसार, लंडनमध्ये तिसऱ्या सामन्याच्या कालावधीत म्हणजे १० ते १४ जुलै दरम्यान पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे.

अवश्य वाचा : गुजरातमध्ये पुलाचे अचानक २ तुकडे;अनेक वाहने नदीत कोसळली,३ जणांचा मृत्यू

इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जोफ्रा आर्चरचे पुनरागमन (England vs India 3rd Test)

इंग्लंडने एक दिवस आधीच प्लेइंग इलेव्हन घोषित केली आहे. इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे. भारताने प्लेइंग इलेव्हन घोषित केली नसली, तरी त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, या सामन्यात जसप्रीत बुमराह पुनरागमन करणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी खेळपट्टीवर गवत असावे आणि वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली,अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार या स्टेडियममध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.

भारताची प्लेइंग इलेव्हन  (England vs India 3rd Test)

शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार /यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप सिंग.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – जॅक क्रॉली , बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रेडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर