Entrance Festival : वाजतगाजत पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव!

Entrance Festival : वाजतगाजत पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव!

0
Entrance Festival : वाजतगाजत पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव!
Entrance Festival : वाजतगाजत पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव!

Entrance Festival : अकोले : रंगीबेरंगी फुगे लावलेले.. फुलांच्या माळा लावून सुंदर पद्धतीने सजवलेला रथ.. स्वागताच्या टोप्या डोक्यात घालून बसलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा उत्साह.. छानदार रांगोळी.. मुलांच्या चित्तवृत्ती प्रसन्न करणाऱ्या वातावरणामध्ये वीरगाव (ता. अकोले) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीत प्रवेश (First Day of School) घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत (Welcome to Students) करणारा प्रवेशोत्सव (Entrance Festival) संस्मरणीय झाला. सजवलेल्या रथात बसवून चिमुकल्या बालगोपालांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

नक्की वाचा: “मी हिरो झालेलं कुणाला कसं आवडेल?”; पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

गुलाबाची फुले देऊन मुलांचं स्वागत

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भीमाशंकर मालुंजकर, उपाध्यक्ष तृप्ती डोळस, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, बाबासाहेब वाकचौरे, सुनील वाकचौरे, विजय वाघ, नामदेव कुमकर, ज्ञानेश्वर वाकचौरे, निवृत्ती गोऱ्हे, काशिनाथ डोळस, विजयसिंह थोरात, आबासाहेब थोरात, लक्ष्मण नजान, मुख्याध्यापक शैला भोईर, स्वामी विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे आदी मान्यवरांच्या हस्ते गुलाबाची फुले देऊन मुलांचं स्वागत करण्यात आलं.

Entrance Festival : वाजतगाजत पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव!
Entrance Festival : वाजतगाजत पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव!

अवश्य वाचा : पोलीस भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू; या रस्त्यावर राहणार एकेरी वाहतूक

शानदार स्वागताने शाळेत आलेली मुलं गेली रमून (Entrance Festival)

मुलांसाठी खास गोड जेवण ठेवलं होतं. धुसपुस नाही, रडारड नाही.. घरची आठवण नाही.. थाटामाटात झालेल्या शानदार स्वागताने शाळेत आलेली मुलं रमून गेली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. रथातून मिरवणूक काढण्यासाठी बाजीराव अस्वले यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रवेशोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सुरेश आरोटे, रामनाथ वाकचौरे, भाऊसाहेब चासकर, भास्कर आंबरे, रावसाहेब सरोदे, मीनल चासकर, अंगणवाडी सेविका देशमुख, मेदगे, पूर्वप्राथमिक वर्गाच्या भांगरे यांनी विशेष परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here