Environment Day : कर्जत : प्रत्येकाने पर्यावरण विषयी आपली कर्तव्य, जबाबदारी आणि जाणीव याबाबत जनजागृती (Public Awareness) काळाची गरज बनली असून पर्यावरण वाचले तरच मनुष्य वाचू शकेल, यासाठी पर्यावरणाबाबत सर्वांनी सजग होत पर्यावरण संवर्धन (Environmental Conservation) ही एक लोकचळवळ ठरावी. याच अनुषंगाने कर्जतची सर्व सामाजिक संघटना मागील १ हजार ७०७ दिवसांपासून कार्य करीत आहे, असे प्रतिपादन सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या (Environment Day) निमित्त आयोजित महाश्रमदान प्रसंगी ते बोलत होते.
नक्की वाचा : ‘मुलीच्या बापाने हुंड्याचे पैसे जावयाला व्यवसायासाठी द्यावेत’; मनोज जरांगेंचं वक्तव्य
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कर्जतची सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम गुरुवारी सकाळी पार पडला. या प्रसंगी कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे, मुख्याधिकारी अक्षय जायभाये, भाजपाचे जेष्ठ नेते प्रवीण घुले, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, सुनील शेलार, लालासाहेब शेळके, देविदास खरात, रवींद्र सुपेकर, नगरसेविका छायाताई शेलार, रोटरीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका’;चेंगराचेंगरीत एकुलता एक मुलगा गमावलेल्या पित्याचा टाहो
सुमारे १ लाख २५ हजार वृक्ष लागवड (Environment Day)
मागील साडेचार वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कर्जत शहर आणि परिसर पर्यावरण समृद्ध करण्यासाठी सलग श्रमदानाच्या माध्यमातून सर्व सामाजिक संघटनेने सुमारे १ लाख २५ हजार वृक्ष लागवड केली आहे. गुरुवारी (ता.५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात वृक्षारोपण करण्यात आले. कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनेच्या पर्यावरण संवर्धनाच्या या कार्यात यापुढे कर्जत नगरपंचायत देखील सर्वार्थाने सहभाग घेत पर्यावरण समृद्धीसाठी कर्जतचा लौकिक वाढविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह मुख्याधिकारी, नगरसेवक यांनी दिली.