
Environmental conservation : संगमनेर : वडगाव पान येथील डी.के. मोरे जनता विद्यालयात (D.K. More Janata Vidyalaya) दरवर्षी राष्ट्रीय सणानिमित्त सर्व विद्यार्थी एकत्र येऊन रांगोळीच्या प्रतिकृतीतून समाज प्रबोधन पर संदेश देत असून यावर्षी बाराशे विद्यार्थ्यांनी एकत्र बैठक करून सेव अर्थ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश (Environmental conservation) दिला. विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतीतून मिळालेला हा संदेश पर्यावरण वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात (Dr. Jayshree Thorat) यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: श्रीरामपुरात पत्नीकडून पतीचा गळा आवळून खून; पोलिसांच्या तपासाने गुढ उकलले
बाराशे विद्यार्थ्यांची बैठक
वडगाव पान येथील डी.के. मोरे जनता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बाराशे विद्यार्थ्यांनी बैठक करून पृथ्वी वाचवा ही प्रतिकृती काढली. यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, प्राचार्य साहेबराव कोल्हे, केंद्रप्रमुख आशा घुले ,प्रा नंदकुमार काळे, क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब, विकास पवार, भारत सोनवणे, प्रकाश नेहे, रवींद्र काशीद यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
अवश्य वाचा: कुकडी कालव्याच्या चारीत आढळला कुजलेला मृतदेह
प्रदूषण हा भयावह आजार (Environmental conservation)
प्रदूषणामुळे हवा पाणी माती आणि पर्यावरण दूषित होत आहे याचा थेट परिणाम मानव आणि प्राणी व निसर्गावर होत असून वाढते प्रदूषण हा भयावह आजार आहे हवामानातील बदल आणि नैसर्गिक आपत्तीचे संकट वाढत असून याकरता आपण पर्यावरण संवर्धन केले पाहिजे झाडे लावली पाहिजे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे पाणी आणि वीज वाचवली पाहिजे कचरा वेगळा करून टाकला पाहिजे अशा विविध संकल्पना चा मंत्र घेऊन विद्यालयातील बाराशे विद्यार्थ्यांनी बैठकीतून पृथ्वी वाचवा सेव अर्थ ही रांगोळी काढली.
हे देखील वाचा: अवैध वाळू उपसा करणारा टिप्पर पकडला; तिघा जणांवर गुन्हा दाखल
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की
यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, जनता विद्यालयातील विद्यार्थी दरवर्षी वेगवेगळ्या प्रतिकृती रांगोळी काढून चांगला संदेश संपूर्ण राज्याला आणि देशाला देत असतात. पर्यावरण संवर्धनासाठी संगमनेर तालुक्यात लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली दंडकारण्य अभियान राबवण्यात आले यातून पर्यावरण संवर्धन संस्कृती वाढली असून विद्यार्थ्यांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा राहिला आहे. आरोग्यावरील संकट सातत्याने वाढत असून याला कारण म्हणजे दूषित पर्यावरण आहे. याकरता वृक्षरोपण ,संवर्धन, कचरा व्यवस्थापन प्लास्टिक मुक्ती यांसह विविध उपक्रम राबवण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे.
ही भव्य प्रतिकृती साकारण्यासाठी प्राचार्य साहेबराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर व कला शिक्षक सत्यानंद कसाब यांनी विशेष मेहनत घेतली असून यामध्ये माजी विद्यार्थी वैभव थोरात, ज्ञानेश्वरी थोरात, समृद्धी थोरात, भगिनी इंगळे, गायत्री खुरसणे, अंकिता घोडके, समीक्षा थोरात यांनीही सहकार्य केले तर डॉ.आचार्य यांनी सर्व रांगोळीच्या खर्च केला.


