Evangeline Booth Hospital : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिजामाता आरोग्य केंद्रासह बूथ हॉस्पिटलमध्ये शिबिर

Evangeline Booth Hospital : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिजामाता आरोग्य केंद्रासह बूथ हॉस्पिटलमध्ये शिबिर

0
Evangeline Booth Hospital : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिजामाता आरोग्य केंद्रासह बूथ हॉस्पिटलमध्ये शिबिर
Evangeline Booth Hospital : स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत जिजामाता आरोग्य केंद्रासह बूथ हॉस्पिटलमध्ये शिबिर

महानगरपालिकेकडून महिलांच्या आरोग्य तपासण्या करून मार्गदर्शन

Evangeline Booth Hospital : अहिल्यानगर : केंद्र सरकारच्या (Central Government) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या आरोग्य विभाग (State Government Health Department) व महानगरपालिकेच्या वतीने अहिल्यानगर शहरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ११ आरोग्य केंद्रांवर महिलांसाठी विविध आरोग्य तपासणी शिबिर, जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील दोन दिवसात जिजामाता आरोग्य केंद्र व बूथ हॉस्पिटलमध्ये (Evangeline Booth Hospital) महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य शिबिर घेऊन महिलांच्या तपासण्या करण्यात आल्या.

अवश्य वाचा: “मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल”-अजित पवार

महिलांच्या विविध आरोग्य तपासण्या

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत या शिबिर व उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. शिबिरात महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी, स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी, गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी, लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी, क्षयरोग तपासणी, सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी आदी तपासण्या करून विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार, मासिक पाळी स्वच्छता व पोषण, टेक-होम राशन (THR) चे वितरण आदी उपक्रम राबविण्यात आले.

नक्की वाचा : शहरातील मुस्लिम महिलांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन (Evangeline Booth Hospital)

अभियानात माता व बालसुरक्षा (एमसीपी) कार्ड, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी, आयुष्मान वय वंदना कार्ड, सिकल सेल कार्ड, पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थी नोंदणी आदी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नागरिकांनी या अभियानात सहभाग घेऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले आरोग्य केंद्र, श्रमिकनगर बालाजी मंदिर सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र, २४ सप्टेंबर रोजी मुकुंदनगर आरोग्य केंद्र, २५ सप्टेंबर रोजी सारसनगर आरोग्यवर्धिनी केंद्र, २६ सप्टेंबर रोजी भूषणनगर केडगाव आरोग्य केंद्र, २७ सप्टेंबर रोजी हिम्मतनगर आरोग्यवर्धीनी केंद्र, २९ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर आरोग्यवर्धिनी केंद्र, ३० सप्टेंबर रोजी तोफखाना आरोग्य केंद्र व १ ऑक्टोबर रोजी नागापूर आरोग्य केंद्र येथे शिबिर व उपक्रम होणार आहेत.