EVM : निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये घोटाळा केला; तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री सुबोध सावजी

EVM : निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये घोटाळा केला; तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री सुबोध सावजी

0
EVM
EVM : निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये घोटाळा केला; तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री सुबोध सावजी

EVM : नगर : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कार्यपद्धतीवर अनेक वेळा शंका उपस्थित केल्या जात आहेत. अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी निवडणूक ईव्हीएम (EVM) न घाईत बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली होती परंतु ती मेनी झाली नाही. अशातच आता लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत, असा दावा माजी महसूल मंत्री तथा अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी (Suboth Sawaji) यांनी केला आहे. सुबोध सावजी यांनी आक्रमक होत म्हटले आहे की निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला; तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्तांचा मर्डर करेल, अशी थेट धमकी दिली आहे.

Election

नक्की वाचा : इंदापूरच्या तहसीलदारांवर अज्ञातांचा जीवघेणा हल्ला, शासकीय वाहनही फोडले

अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध (EVM)

सावजी यांच्या धमकीमुळे एकच खळबळ उडाली आहे. धमकीचे पत्र त्यांनी दिल्ली कार्यालयाला पाठवल्याने यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. माजी महसूल मंत्री तथा अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी आपली अनोखी आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नासाठी धमक्या देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

हेही पहा : डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी उलगडून सांगितली नारदीय कीर्तनाची परंपरा

अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार

त्यांनी एका ईमेल द्वारे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, भारतात झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असलेल्या मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीकडेच आहे. या आधारे 48 जागांपैकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारच. परंतु जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही. असा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.

EVM
EVM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here