EVM : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

EVM : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

0
EVM : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण
EVM : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

EVM : नगर : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक (Lok Sabha Elections) २०२४ अंतर्गत ३७-अहमदनगर मतदारसंघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी लोकसभा मतदारसंघामध्ये ‘चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी, मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ (EVM) बाबत केलेला अर्ज भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निकाली काढल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित वृत्त चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नक्की वाचा: आसाम सरकारचा मोठा निर्णय; नमाज पठणासाठी आमदारांना दर शुक्रवारी मिळणारी सुट्टी बंद

याचिका अद्याप प्रलंबित

या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसून डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील निवडणूक प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू असून ही याचिका अद्याप प्रलंबित आहे.

अवश्य वाचा: पतीचा खून करणारी वकील पत्नी प्रियकरासह गजाआड

निवडणूक निर्णय अधिकारी पुढील कार्यवाही करणार (EVM)

‘चेकींग अँड व्हेरिफीकेशन ऑफ बर्न्ट मेमरी, मायक्रोकन्ट्रोलर ऑफ ईव्हीएम’ बाबत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ जे निर्देश देतील, त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.