EVM | ईव्हीएम पडताळणीसाठी थोरात, लंके, शिंदे यांचा अर्ज

0
Vote Counting : मोठी बातमी! 'या' विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी
Vote Counting : मोठी बातमी! 'या' विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

EVM | नगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेर मतदारसंघातील १४ तर पारनेर मतदारसंघातील १८ ईव्हीएम (EVM) पडताळणीसाठी पराभूत उमेदवार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), राणी लंके (Rani Lanke)राम शिंदे (Ram Shinde) यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (शुक्रवार) शेवटचा दिवस असल्याने आणखी अर्ज वाढण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा : ‘देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी

तनपुरे, वर्पेंचा अर्ज आधीच दाखल (EVM)

काल (बुधवारी) राहुरी मतदारसंघातील संघातील पाच ईव्हीएम पडताळणीसाठी पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी तर कोपरगाव मतदार संघातील पराभूत उमेदवार संदीप वर्पे यांनी एक मतदान केंद्रावरील पडताळणीसाठी अर्ज दाखल केला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत पराभूत उमेदवारांना ईव्हीएम पडताळणी बाबत मागणी करता येते. यानुसार संगमनेर मतदार संघातील घुलेवाडी, वडगावपान, राजापूर, जवळे कडलक, धांदरफळ, साकुर, निमोण, चांडेवाडी या मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी ४० हजार रुपये रक्कम व १८ टक्के जीएसटीसह शुल्क भरले आहे. 

अवश्य वाचा : जिल्ह्यात मंत्रिपदासाठी कोणाची लागणार वर्णी?

४५ दिवसांनंतर पडताळणी (EVM)

पारनेर मतदार संघातील दोन नंबरचे उमेदवार राणी लंके यांनी देखील १८ मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी ८ लाख ४९ हजार ८०० रुपयांचे शुल्क भरले आहे. यात नागरपूरवाडी, वनकुटे, पठारवाडी, सुतारवाडी, भाळवणी, वडगाव गुप्ता, निंबळक, सुपा, वाळवणे, निघोज, वाडेगव्हाण या मतदान केंद्राचा समावेश आहे. राहुरी मतदार संघातील नंबर दोनचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी आज (बुधवारी) मतदारसंघातील पाच मतदार केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यासाठी त्यांनी एक मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये असे पाच केंद्राचे एकूण २ लाख ३६ हजार रुपये शुल्क भरले आहे. तसेच कोपरगाव मतदार संघातील पराभूत उमेदवार संदीप वर्पे यांनी देखील ईव्हीएम पडताळणी बाबत अर्ज दाखल केला आहे. यासाठी त्यांनी ४७ हजार २०० रुपये शुल्क प्रशासनाकडे भरले आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राम शिंदे यांनी १७ बुथवरील पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी ८ लाख २ हजार ४०० रुपये शुल्क भरला आहे. दरम्यान, निकाल लागल्यानंतर ४५ दिवसानंतर  पडताळणी केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here