EVM : ईव्हीएम पडताळणीसाठी कळमकर, घोगरे, जगताप, ढाकणे यांचा अर्ज

EVM : ईव्हीएम पडताळणीसाठी कळमकर, घोगरे, जगताप, ढाकणे यांचा अर्ज

0
EVM : ईव्हीएम पडताळणीसाठी कळमकर, घोगरे, जगताप, ढाकणे यांचा अर्ज
EVM : ईव्हीएम पडताळणीसाठी कळमकर, घोगरे, जगताप, ढाकणे यांचा अर्ज

EVM : नगर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) नगर शहरातील मतदारसंघातील ३, श्रीगोंदा मतदारसंघातील २, शिर्डी मतदार संघातील २ तर पाथर्डी मतदार संघातील २ पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम (EVM) पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer) सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज (शुक्रवार) शेवटचा दिवस होता.

नक्की वाचा : मोठी बातमी! ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

या मतदान केंद्रावरील होणार फेरपडताळणी (EVM)

नगर शहर मतदार संघातील पराभूत उमेदवार अभिषेक कळमकर यांनी सावेडी, बोल्हेगाव, चाहुराणा मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी अर्ज केला आहे. तसेच श्रीगोंदा मतदार संघातील पराभूत उमेदवार राहुल जगताप यांनी दोन मतदान केंद्रावरील फेर पडताळणी अर्ज केला आहे. यामध्ये चिचोंडी पाटील, पेडगाव या मतदान केंद्राचा समावेश आहे. शिर्डी मतदार संघातील पराभूत उमेदवार प्रभावती घोगरे यांनी देखील पडताळणीसाठी अर्ज केला आहे. यामध्ये साकुर आणि लोणी खुर्द या मतदान केंद्राचा समावेश आहे. तर शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील उमेदवार प्रताप ढाकणे यांनी शिरसाटवाडी व मोहटा मतदान केंद्रावरील ईव्हीएम पडताळणी अर्ज केला आहे. यासाठी निवडणूक विभागाकडे पडताळणी शुल्क भरले आहे. एक मतदान केंद्रासाठी ४७ हजार २०० रुपये प्रमाणे हे शुल्क भरले आहेत. दरम्यान, निकाल लागल्यानंतर ४५ दिवसानंतर पडताळणी केली जाणार आहे.