EVM machine : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्व मते मोजली जावीत, सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

EVM machine : ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील सर्व मते मोजली जावीत, सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस

0
EVM machine

EVM machine : नगर : व्हीव्हीपॅटमधील सर्व मते आणि ईव्हीएम मशिन (EVM machine) मधील मते मोजली जावीत यासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. न्यायामुर्ती बी आर गवई आणि न्यायमुर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने निवडणूक आयोगाला (Election Commission) नोटीस पाठवली आहे.

EVM machine

हे देखील वाचा: नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम

व्हीव्हीपॅटमधील मतांच्या सरसकट मोजणीची मागणी (EVM machine)

अरूण कुमार अग्रवाल, नेहा राठी यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांनी निवडणूक व्हीव्हीपॅट मशिनची मोजणी न करता सरसकट मोजणी करावी, अशी मागणी केली आहे. भारतात कोट्यावधी रूपये खर्च करून व्हीव्हीपॅट मशिनची खरेदी केली जाते. त्यामुळं या व्हीव्हीपॅटमशीनमधून निघालेल्या पुर्ण मतदानाची मोजणी केली जावी, अशी मागणी या याचिकेत केली आहे. त्याचबरोबर इव्हीएमच्या बाबत शंका घेणारे अनेक रिपोर्ट आल्यामुळं सर्व व्हीव्हीपॅट मतदानाची मोजणी केली जावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.

नक्की वाचा: उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

गैरप्रकार टाळण्यासाठी मागणी (EVM machine)

दरम्यान, विरोधी पक्षांनी अनेकवेळा मागणी केली आहे की, प्रत्येक मतदारासाठी व्हीव्हीपॅटवरून स्लिप जारी करण्यात यावी. व्हीव्हीपीएट मशीन ईव्हीएमशी जोडलेले असते. याद्वारे मतदारांना कळू शकते की, त्यांनी ज्या उमेदवाराच्या नावाचे बटन ईव्हीएमवर दाबले आहे, मत त्यांनाच गेलं आहे की, नाही, हे या माध्यमातून कळतं. तसेच मतदाराची शंकाही दूर होते. यात मतदार जेव्हा मतदान करतात तेव्हा व्हीव्हीपॅट मशीनमधून एक स्लिप बाहेर येते, ज्यावर उमेदवाराचे नाव आणि निवडणूक चिन्ह छापलेले असते. असं असलं तरी यावरून बाहेर येणारी स्लिप 7 सेकंदांसाठीच मतदाराला दिसते. जी काचेतून मतदाराला पाहता येते. निवडणुकीत काही गैरप्रकार होण्याची शक्यता असल्यास स्लिप्सची जुळवाजुळव करून निकाल लावला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here