Ex-Serviceman : नगर : जिल्ह्यातील त्रिदल सैनिक सेवा संघ, जय हिंद फाऊंडेशन (Jai Hind Foundation) व दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघाच्या वतीने माजी सैनिक (Ex-Serviceman), शहीद परिवार व सैनिक परिवारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय आरक्षणाची (Political Reservation) मागणी राज्य सरकारकडे (State Government) करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांना देण्यात आले. राज्यभरातून या मागणीचा जोर वाढू लागला आहे.
नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर
माजी सैनिकांसाठी एक सदस्यत्व राखीव ठेवण्याची मागणी
यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघाचे गोवर्धन गर्जे, संजय म्हस्के, मारुती ताकपेरे, आबासाहेब कांडेकर, जय हिंद फाऊंडेशनचे शिवाजी पालवे, संजय पाटेकर, भाऊसाहेब पालवे, दि व्हॅलेनटस माजी सैनिक संघाचे भारत खाकाळ, भगवान डोळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील माजी सैनिक बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे यासाठी संघटनांनी ठोस मागणी केली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका अशा प्रत्येक ठिकाणी माजी सैनिकांसाठी किमान एक सदस्यत्व राखीव ठेवावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अवश्य वाचा : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची मागणी
मुख्यमंत्री, निवडणूक आयुक्तांना पाठविले निवेदन (Ex-Serviceman)
याचबरोबर राज्यपाल नियुक्त आमदार, विधान परिषद, राज्यसभा व लोकसभेत माजी सैनिकांना प्रतिनिधित्व मिळावे, अशीही मागणी करण्यात आली. राज्यभरातील विविध जिल्ह्यांत एकाचवेळी निवेदने देऊन हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल तसेच राज्य निवडणूक आयुक्तांना देखील निवेदन पाठविण्यात आले आहे.