Ex-Servicemen : नगर : आजी- माजी सैनिक/अर्धसैनिक (Ex-Servicemen), वीरनारी, वीरपिता व वीरमाता यांना पोलीस मुख्यालय (Police Headquarters) व पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या अडचणींसाठी अनेक दिवस ताटकळत थांबावे लागते. कागदोपत्री कामांसाठी अनेक चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे अहिल्यानगरच्या 32 पोलीस स्टेशनमध्ये सैनिक अर्धसैनिकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावे. यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे (Somnath Gharge) यांनी एक लेखी अधिसूचना काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नक्की वाचा : ‘नारायण राणेंच्या नेपाळ्यासारख्या टिल्ल्या लेकाने नाक घासून माफी मागावी’- संजय राऊत
अनेक दिवस ताटकळत थांबावे लागत
सैनिक सुरक्षा पंधरवडा अंतर्गत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घार्गे यांनी धडाडीची मोहीम हाती घेण्यात आली. आजी- माजी सैनिक/अर्धसैनिक, वीरनारी, वीरपिता व वीरमाता यांना पोलीस मुख्यालय व पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या अडचणींसाठी अनेक दिवस ताटकळत थांबावे लागते. त्यांना शारीरिक व मानसिक त्रास व अपमान सहन करावा लागतो. याचमुळे सैनिकांप्रती आदर व्यक्त करत, यापुढे अहिल्यानगरच्या 32 पोलीस स्टेशनमध्ये सैनिक अर्धसैनिकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावे. यासाठी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी एक लेखी अधिसूचना काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या आदेशाची अवहेलना करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय कारवाई सामोरे जावे लागेल, असे सक्तीचे आदेश प्रत्येक पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले.
अवश्य वाचा : वाल्मिक कराडला करायची होती धनंजय मुंडेंच्या पीएची हत्या; विजयसिंह बांगर यांचा खुलासा
तात्काळ कारवाई करण्याचे आदेश (Ex-Servicemen)
माजी सैनिक (शिक्षक)अशोक चौधरी यांनी सैनिक व अर्धसैनिकांना पोलीस स्टेशनमध्ये मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणूंची सविस्तर तक्रार एसपी आहिल्यानगर यांच्याकडे मांडली व त्याबद्दल एसपींनी संबंधित डीवायएसपी व पोलीस स्टेशन प्रभारी यांना फोन करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था (म.रा)अध्यक्ष मेजर निलकंठ उल्हारे यांनी पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सकारात्मक उचललेले पाऊल याबद्दल मनोभावे कौतुक केले. आपण नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा बसवण्याच्या प्रक्रियेला शुभेच्छा दिल्या व हे कार्य असेच निरंतर चालू राहील अशी आशा व्यक्त केली. या पाठपुराव्यासाठी मेजर उल्हारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी महाराष्ट्र त्रिदल कोर कमिटीचे अध्यक्ष अशोक चौधरी, जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे, मारुती ताकपेरे, लहू सुलाखे, निवृत्ती आंग्रे व पिंगळे आप्पासाहेब, नारायण पालवे आदी उपस्थित होते.