Ex-students : श्रीगोंदा: तालुक्यातील कोळगाव येथील श्री कोळाईदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (Secondary and Higher Secondary School) येथील सन १९८९ ते सन १९९४ या कालावधीतील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा (Get-Together) उत्साहात पार पाडला. या निमित्ताने तब्बल ३० वर्षांनी मित्र-मैत्रिणींची पुन्हा भेट झाली. या माजी विद्यार्थ्यांच्या (Ex-students) वतीने विद्यालयासाठी ५० हजार रुपये किमतीचा संगणक (Computer) संच भेट देण्यात आला.
अवश्य वाचा: कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे बिबट्या जेरबंद
अनेक अडचणींवर मात करून मित्र-मैत्रिणींशी संपर्क
आपल्या जुन्या मित्रांना एकत्र आणण्याची धडपड शिवसेना श्रीगोंदा उपतालुकाप्रमुख आण्णासाहेब जगताप अंबादास वाळके, शिला मिसाळ या मित्रांनी केली. आण्णासाहेब जगताप व अंबादास वाळके यांचा सहा वर्षांपासून एकत्र यायचे हा प्रयत्न चालू होता. अनेक अडचणींवर मात करून व सर्व मित्र-मैत्रिणींशी संपर्क करून शेवटी एकदाचे रविवारी या सुट्टीच्या दिवशी सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत काटे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक शहाजी नलगे मेजर होते. रामदास जठार, शंकरराव कदम, नानासाहेब साबळे, पारखे सर, अशोकराव पंडित, पोपटराव खेतमाळीस, लोकरे मॅडम हे सर्व सेवानिवृत्त शिक्षक यावेळी उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर माजी विद्यार्थी यांच्या वतीने शाल व श्रीफळ भेट स्वरूपात देऊन सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
नक्की वाचा: प्रभाग 12 मध्ये मातब्बर उमेदवारांसमोर शुभ्रा तांबोळी आणि अमोल निस्ताने यांचे तगडे आव्हान
यांनी व्यक्त केले मनोगत (Ex-students)
शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक शहाजी हिरडे आणि विद्यालयातील शिक्षक व माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रशांत खामकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी मेजर अंकुश लाटे, नंदा लगड, शिवाजी ढोरजकर, वैशाली नलगे, सिंधू रायकर, सुनिता साके, मंदाकिनी बारगुजे, मनोहर मेटे, अरुणा हराळ, संतोष नलगे, गोवर्धन दारकुंडे, सुनिता खामकर, नंदा काटे, सुरेखा लगड, बिजल धस, अशोक धस, मधुकर लगड, शिवाजी भोसले, चंद्रकांत वाणी, सोमनाथ लगड, विद्या नलगे, पुजा वाणी, कांचन उजगरे, वनिता मानकर, किरण लाटे, दत्ता पवार, सोनबा बांदल, दत्तात्रय मुंडफण, संतोष लगड, मुक्ताजी गायकवाड, संजय बारगुजे यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयासाठी ५० हजार रुपये किमतीचा संगणक संच भेट देण्यात आला. यापुढे ही आपण सर्व आपल्या शाळेच्या विकासाला हातभार लावूया, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत करूया.वृक्षारोपण करून वृक्ष वाढवूया.असाही संकल्प या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक माऊली गलांडे, शेलार मामा उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णासाहेब जगताप व शिला मिसाळ यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार लालासाहेब पानसरे यांनी मानले.



