Excise Duty Department : उत्पादन शुल्क विभागाच्या ४२ कामांना प्रशासकीय मान्यता ; अहिल्यानगर जिल्हयाचा समावेश

Excise Duty Department : उत्पादन शुल्क विभागाच्या ४२ कामांना प्रशासकीय मान्यता ; अहिल्यानगर जिल्हयाचा समावेश

0

Excise Duty Department : नगर : राज्य उत्पादन शुल्क विभाग (Excise Duty Department) हा शासनास महसूल (Revenue) प्राप्त करून देणाऱ्या विभागापैकी तिसरा महत्वाचा विभाग आहे. या विभागातील निरीक्षक व अधीक्षकांच्या कार्यालयांचे बांधकाम टाईप प्लॅननुसार करण्यात येत आहे. शासनाने (Government) विभागाच्या राज्यातील ४२ ठिकाणच्या विविध बांधकामासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असून अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!यूपीएससी परीक्षेची जाहिरात निघाली 

या कामांचा समावेश

पूर्ण झालेल्या बांधकामांमध्ये राज्य उत्पादन शुल्क भवन मुंबई, नाशिक अधीक्षक यांचे निवासस्थान, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय जालना, हिंगोली, अमरावती, कर्मचारी निवासस्थान वाशिम, निरीक्षक कार्यालय संरक्षक भिंत तळेगांव दाभाडे जि. पुणे, निरीक्षक कार्यालय व निवासस्थान संगमनेर जि. अहिल्यानगर, भरारी पथक निरीक्षक कार्यालय सटाणा जि. नाशिक यांचा समावेश आहे.

अवश्य वाचा :  …’त्या’ वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले स्पष्टीकरण 

सर्व कार्यालये अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरु (Excise Duty Department)

विभागातील सर्व कार्यालये अद्यावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आहे. त्यापैकी 9 बांधकामे पूर्ण झाली आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नविन आकृतीबंध मंजूर झालेला आहे. विभागामार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण अंदाजे २३ हजार २८९ कोटी इतका महसूल प्राप्त झाला आहे.