Exit Poll 2024 : नगर, शिर्डी लाेकसभा काेण जिंकणार? एक्झिट पोलने काय वर्तविले भाकीत?

विविध संस्थांच्या एक्झिट पोलने(Exit Poll 2024) वर्तविलेल्या अंदाजांमुळे नगर जिल्ह्याचे खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

1
Exit Poll 2024
Exit Poll 2024


Exit Poll 2024 नगर : नगर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ (Lokshabha Matdarsangah) आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान झाले. दोन दिवसांनी या मतदारसंघातील जनतेने कोणाला कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी विविध संस्थांच्या एक्झिट पोलने(Exit Poll 2024) वर्तविलेल्या अंदाजांमुळे नगर जिल्ह्याचे खासदार कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Exit Poll 2024
Exit Poll 2024

हे देखील वाचा: मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; नगर, शिर्डी लाेकसभेसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती


नगर जिल्ह्यातील राजकारण हे नेहमीच पक्षीय राजकारणाला विचार करायला लावणार ठरलं आहे. या जिल्ह्याचे राजकारण सहकारी साखर कारखाने व त्याच्या परिसरातील शैक्षणिक संस्था, नाते-गोते या भोवती फिरणारे ठरले आहे. त्यामुळे येथे पक्षापेक्षा उमेदवार महत्त्वाचा ठरतो. सुरुवातीला जिल्हा सहकारी बँकेतील राजकारणापासून जिल्ह्यातील राजकारणावर नियंत्रण मिळविण्याला भाऊसाहेब थोरातांनी सुरुवात केली. आणि नंतर बाळासाहेब विखेंनीही यात मास्टरी मिळविली. जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक तालुका व गावागावांत त्यांनी आपली कार्यकर्त्यांची फळी उभी केली. त्यालाच विखे गट असे म्हटले जाते. विखे असो अथवा थोरात या दोन्ही गटातील कार्यकर्ते सर्वच पक्षांत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीत हे कार्यकर्ते वरकरणी एका पक्षाचे काम करताना दिसतात अन् ऐन वेळी मतदान दुसऱ्यासाठी घडवितात. हे जिल्ह्याचे अजब राजकारण आहे. 

Exit Poll 2024
Exit Poll 2024
Exit Poll 2024
Exit Poll 2024

नक्की वाचा: 100 टन सोनं ब्रिटनमधून आलं भारतात

मतदारांचा काैल कुणाला (Exit Poll 2024)


दोन्ही मतदारसंघात बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांनी मैदान पिंजून काढले. मात्र, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केवळ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात तर उद्धव ठाकरे यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातच आपापल्या पक्षाच्या उमेदवारासाठी सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर शहरात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी सभा घेतली.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी दोन दिवसांपूर्वीच मला सर्वच पक्षीयांनी मदत केल्याने माझा विजय होणार असल्याचे सांगितले. तर विखे गटानेही आपली ताकद वापरल्याची चर्चा आहे. नेहमी प्रमाणे यंदाची लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत पक्षाच्या नावाने एकाचा प्रचार व ऐन वेळी दुसऱ्यासाठीच मतदान असा पक्ष विरहीत नगरी फंडा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणी नेते फोडले तर कोणी कार्यकर्तेच फोडल्याचे राजकीय प्रयोग नगर दक्षिणेत पहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीचे भारत भरातील मतदान प्रक्रिया आटोपताच शनिवारी (ता. १) पासून विविध संस्थांकडून एक्झिट पोल व्यक्त करण्यात आले. यात टीव्ही ९, एबीपी माझा, लोकशाही मराठी व दैनिक सकाळने नीलेश लंके यांना तर दैनिक पुढारी, आयबीएन लोकमत, मुंबई तकने डॉ. सुजय विखे पाटील यांना मतदारांचा कौल मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या परिस्थितीमुळे मतदार कोणाच्या पारड्यात विजयाचे दान देणार हे मंगळवारी (ता. ४) समजणार  आहे.

Exit Poll 2024
Exit Poll 2024

४ जूनला हाेणार स्पष्ट (Exit Poll 2024)


शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगामी राजकीय गणिते डोळ्यासमोर ठेवून राजकीय खेळी झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. वंचित बहुजन आघाडीनेही काँग्रेसच्या उत्कर्षा रुपवते यांना संधी देत आपणही स्पर्धेत असल्याचे दाखविले. मात्र, या मतदारसंघात विखे व थोरात काय निर्णय घेतात. यावर तेथील राजकीय समीकरणे ठरतात. महायुतीचे सदाशिव लोखंडे हे दोन वेळा तर महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे हे एक वेळा याच मतदारसंघातून यापूर्वी खासदार राहिले आहेत. त्यामुळे जनतेला या दोन्ही उमेदवारांच्या कामाचा अनुभव होता. सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या विरोधात जनतेची काहीशी नाराजी होती. तर वाकचौरे हे नेहमीच पक्ष बदलत असल्याने त्यांच्यावरही काहीशी नाराजी होती. वाकचौरे हे विखे गटाला जवळचे समजले जातात. तर लोखंडे यांच्या पाठीशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ठामपणे उभे असल्याचे दिसले. लोखंडे जरी दहा वर्षे या मतदारसंघात खासदार असले तरी ते मतदारसंघात कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात फेल झाल्याचे प्रचारात दिसून आले. त्यांना महायुतीतील आमदारांच्या बळावर कार्यकर्ते जमवावे लागत होते. याचाच परिणाम प्रचार सभांतूनही दिसून आला.या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नाही. या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता दैनिक पुढारीचा एक्झिट पोल वगळता सर्वांनीच भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे.  हे अंदाज जरी व्यक्त करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष बाजी कोण मारणार हे मंगळवारी (ता. ४) समजणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here