Explosion : गॅस टाकीचा स्फोट; दोन जण जखमी

Explosion : गॅस टाकीचा स्फोट; दोन जण जखमी

0
Explosion

Explosion : कर्जत : शहरालगत बर्गेवाडी शिवारात गॅस टाकीचा स्फोट (Explosion) होऊन दोन जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.१) रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. या स्फोटात एक दुचाकी जळाली (Fire) असून, घराच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे घटनास्थळाला लागूनच अवघ्या दोन फूट अंतरावर गॅस टाक्याचे गोडावून आहे. बाहेरील परिसरात शेकडो गॅस टाक्या (Gas tank) उघड्या पडल्या होत्या. नशीब बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. सदर घटनेने ग्रामस्थ भयभीत झाले होते.

हे देखील वाचा: नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम

स्फोटाने बसले हादरे

सोमवारी संध्याकाळी सव्वा आठच्या सुमारास बर्गेवाडी (ता.कर्जत) येथे गॅस टाकीचा स्फोट होऊन आग लागली. आग इतकी मोठी होती की, कर्जत शहर आणि बर्गेवाडी परिसरात गॅसटाकीच्या स्फोटाने हादरे बसले. आगीचे लोळ उंच उडत होते. लगतच एका गॅस कंपनीचे गॅस टाक्याचे गोडावून आणि त्यांचा शेकडो टाक्यांचा परिसरातील साठा याने ग्रामस्थ भयभीत झाले होते. कोणीच पुढे जाण्यास तयार होत नव्हते. कर्जत नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

नक्की वाचा: उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

आगीत मोठे नुकसान (Explosion)

या आगीत एकूण १२ पुर्ण जळालेल्या गॅसटाक्या, २ लहान गॅस टाक्या, ५ सिलेंडर गॅस स्फोटामध्ये जळालेल्या अवस्थेतील तुटलेल्या गॅस टाक्या आणि पोल्ट्री शेडच्या बाहेर ३ एचपी कंपनीच्या लाल रंगाच्या भरलेल्या गॅस टाक्या मिळून आल्या. यासह चार इलेक्ट्रिक मोटार जळालेल्या अवस्थेत, एक जळालेला स्टोव्ह, संसार उपयोगी भांडी व साहित्य, जळालेल्या अवस्थेतील गहू, स्कुटी, गाडीचा पूर्ण जळून शिल्लक राहिलेला सांगाडा, तसेच सायकलचा सांगाडा आढळून आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here