Extortion : कांदा व्यापाऱ्याला खंडणी मागणारे चौघे गजाआड

Extortion : कांदा व्यापाऱ्याला खंडणी मागणारे चौघे गजाआड

0
Extortion
Extortion : कांदा व्यापाऱ्याला खंडणी मागणारे चौघे गजाआड

Extortion : राहुरी : १० लाख रुपयांची खंडणी (Extortion) दिली नाही म्हणून एका बड्या व्यापाऱ्याला पहाटेच्या दरम्यान शस्त्राचा धाक दाखवून लूटण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच खंडणी दिली नाहीतर कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने या घटनेतील चार आरोपींना (Accused) गजाआड केले. पथकाने नागेश चिमाजी देवकर (वय २८, रा. राहुरी वेस, वांबोरी, ता. राहुरी), शशिकांत युवराज सुखदेव (वय २५, रा. शिक्षक कॉलनी, बेलापूर, ता. श्रीरामपूर), बबलू रामदास कुसमुडे (वय ३०) व संदीप रामदास कुसमुडे (वय ३५, दोघे रा. राहुरी वेस, वांबोरी, ता. राहुरी) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

हे देखील वाचा: नगर लोकसभा निवडणुकीत आता दुरंगी लढत; नाटयमय घडामाेडीनंतर भल्याभल्यांची सपशेल माघार

१० लाख रुपयांची मागणी (Extortion)

वांबोरी येथील अक्षयकुमार सुरेशचंद मुथा या कांदा व्यापाऱ्यांला २० मार्च रोजी फोनवरुन तुझ्या मुलीस सुखरुप पहायचे असेल तर ५ लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, असा फोन आला होता. त्यावेळी मुथा यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर २५ एप्रिलला पहाटे ५.३० वाजता अक्षयकुमार मुथा हे व्यायामासाठी घरातून बाहेर गेले होते. तेव्हा अनोळखी चार आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून मुथा यांचे डोळ्यात कोणता तरी स्प्रे मारला आणि त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या काढून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच खंडणी दिली नाहीतर परिवाराला संपवून टाकण्याची धमकी दिली. वेळोवेळी खंडणीसाठी फोन करुन आम्हीच तुझ्यावर हल्ला केला. आता तुला १० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. या घटने बाबत मुथा यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

नक्की वाचा : अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची सुटका

आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी (Extortion)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे समांतर तपास सोपविण्यात आला होता. पथकाने गुप्त खबर व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे रविवारी (ता. २८) पांढरीपूल येथे छापा टाकून नागेश चिमाजी देवकर व शशिकांत युवराज सुखदेव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच दोन साथीदारांची नावे सांगितली. तेव्हा पोलीस पथकाने बबलू रामदास कुसमुडे व संदीप रामदास कुसमुडे या दोघांना त्यांच्या राहात्या घरातून ताब्यात घेतले. आरोपींना आज राहुरी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here